scorecardresearch

Premium

जळगाव : पारोळा तालुक्यात तीन वाहनांच्या अपघातात तीन महिलांचा मृत्यू, २० जण जखमी

पारोळा तालुक्यातील विचखेडा फाट्यानजीक वळणरस्त्यावर शुक्रवारी मालवाहू मोटार, मालमोटार आणि जीप यांच्यात अपघात होऊन तीन महिलांचा मृत्यू , तर २० जण जखमी झाले.

Three women killed accident Parola taluka
जळगाव : पारोळा तालुक्यात तीन वाहनांच्या अपघातात तीन महिलांचा मृत्यू, २० जण जखमी (छायाचित्र – लोकसत्ता टीम/ग्राफिक्स)

जळगाव – पारोळा तालुक्यातील विचखेडा फाट्यानजीक वळणरस्त्यावर शुक्रवारी मालवाहू मोटार, मालमोटार आणि जीप यांच्यात अपघात होऊन तीन महिलांचा मृत्यू , तर २० जण जखमी झाले. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

पारोळा तालुक्यातील बोळे येथून चिलाणे (ता. शिंदखेडा, जि. धुळे) येथे नातेवाइकाच्या अंत्यविधीसाठी मालवाहू मोटारीतून काही जण जात होते. विचखेडा फाट्यानजीक वळणरस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालमोटार ही मालवाहू मोटारीवर आदळली. त्याचवेळी समोरून येणारी भरधाव जीपही आदळली. या विचित्र अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू, तर २१ जण गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच, बोळेसह परिसरातील ग्रामस्थांनी, तसेच पारोळा येथील पोलीस अधिकारी, कर्मचार्‍यांनी धाव घेतली. जखमींना पारोळा येथील कुटीर रुग्णालयात हलविण्यात आले. गंभीर जखमी एका महिलेचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. तीन जखमींना धुळे येथे, तर इतर जखमींना प्राथमिक उपचार करून खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.

vehicle fell into a valley Nandurbar district
नंदुरबार जिल्ह्यात वाहन दरीत कोसळून चार जणांचा मृत्यू
horrific accident near Bhigwan
भिगवणजवळ भीषण अपघातात तिघांचा मृत्यू
Three workers died in Baglan taluka when crane broke down
बागलाण तालुक्यात क्रेन तुटून तीन कामगारांचा मृत्यू
girlfriend boyfriend dead Pardi
वर्धा : १५ दिवसांपासून बेपत्ता प्रेमीयुगुल मृतावस्थेत आढळले, दोघांनी पायाला ओढणी बांधून…

हेही वाचा – नवीन उड्डाणपूल, वळण मार्गासाठी नितीन गडकरींकडे पाठपुरावा, खचलेल्या पूल पाहणीवेळी डॉ. भारती पवार यांचे आश्वासन

हेही वाचा – सातव्या वेतन आयोगाच्या फरकासाठी वनविकास कर्मचाऱ्यांचे आंदोलन

अपघातात रेखाबाई कोळी (५५), योगिता पाटील (४०, दोन्ही रा. बोळे, ता. पारोळा) यांचा जागीच, तर चंदनबाई गिरासे (६५) यांचा उपचारासाठी नेत असताना वाटेत मृत्यू झाला. जखमींमध्ये भरत गिरासे (६५), रणजित गिरासे (६०), भीमकोर गिरासे (५०), राजेशभाई कोळी (४५), अजतसिंग गिरासे (५०), भुराबाई तात्या गिरासे (४०), भुराबाई मोहनसिंग गिरासे (४०), रेखाबाई गिरासे (५०), नानाभाऊ गिरासे (५५), भटाबाई गिरासे (४५), सुनीता गिरासे (४४), भुराबाई भीमसिंग गिरासे, भीमकोरबाई जगत गिरासे (६०), भगवानसिंग गिरासे (६५), रंजनसिंग गिरासे (५५), हिराबाई गिरासे (४०), राजेबाई कोळी (४५), दयाबाई गिरासे (५५), रूपसिंग गिरासे (६०), सय्यद लियाकत (२१, रा. मालेगाव) यांचा समावेश आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three women killed 20 injured in three vehicle accident in parola taluka ssb

First published on: 01-12-2023 at 19:33 IST

आजचा ई-पेपर : नाशिक

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×