scorecardresearch

नंदुरबारच्या शहादामध्ये ट्रॅव्हल्स आणि आयशरची जोरदार धडक ; तीन जण ठार तर १७ जण जखमी

शहादा शहरातील बायपास रस्त्यावर असणाऱया नवीन बस स्थानका जवळ हा अपघात झाला आहे.

नंदुरबारच्या शहादामध्ये ट्रॅव्हल्स आणि आयशरची जोरदार धडक ; तीन जण ठार तर १७ जण जखमी

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातील बायपास रस्त्यावर खाजगी ट्रव्हल्स आणि आयशर यांच्यात भीषण धडक झाली आहे. या अपघातात तीण जण ठार तर १७ जण गंभीर जखमी झाले आहेत. शहादा शहरातील बायपास रस्त्यावर असणाऱया नवीन बस स्थानका जवळ हा अपघात झाला आहे.

आयशर मधील मजुर हे ऊसतोडणी साठी सांगलीकडे जात असल्याची प्राथमिक माहीती आहे. तर खाजगी ट्रॅव्हल्स मध्ये देखील मजुर हे मजुरीसाठी गुजरात कडे जात होते. घटनेची माहिती मिळताच शहादा पोलीसाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-09-2022 at 17:47 IST

संबंधित बातम्या