नंदुरबार – इयत्ता दहावी, बारावी परीक्षांमध्ये ज्या विषयात विद्यार्थी नापास होईल, त्या शिक्षकाची पगारवाढ बंद करण्याचे संकेत आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांसंदर्भात राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले आहेत. आश्रमशाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी विद्यार्थ्यांच्या तीमाही परीक्षांसह शिक्षकांचीही तीमाही चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातून विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या शैक्षणिक दर्जाचे मूल्यमापन होणार असल्याचे मंत्री डाॅ. गावित यांनी येथे सांगितले.

राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांचा दर्जा सुधारावा, यासाठी सध्या आश्रमशाळा आणि वसतिगृहाच्या बांधकामासाठी कोट्यावधींचा निधी देण्यात आला आहे. यातून अनेक प्रकल्पातील आश्रमशाळा आणि वसतिगृहांचा कायापालट होत असतांना दुसरीकडे आश्रमशाळांमधील शैक्षणिक दर्जाबाबत चिंता व्यक्त होत आहे. त्यामुळे आता याबाबत कठोर पावले उचलले जात आहेत. त्यामुळेच यापुढे आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये दहावी, बारावी परीक्षेत ज्या विषयात विद्यार्थी नापास होईल, त्या शिक्षकाची पगारवाढ बंद करण्यात येईल, असा निर्णय विभागाने घेतल्याचे डॉ. गावित यांनी सांगितले. आश्रमशाळेतील मुले पहिलीपासून दहावीपर्यत आश्रमशाळेतच राहत असतांना ते नापास होतातच कसे, असा प्रश्न उपस्थित करुन या मुलांना कमीतकमी ७५ टक्के गुण मिळायला हवेत, असे गावित म्हणाले.

Case of NEETUG paper leak Four more students arrested in Bihar
बिहारमध्ये आणखी चार विद्यार्थ्यांना अटक; ‘नीटयूजी’ पेपर फुटीचे प्रकरण, पाटणा ‘एम्स’मधील वसतिगृहाच्या खोल्याही ‘सील’
Chandrakant Patil, Chandrakant Patil minister,
मुलींना प्रवेश नाकारणाऱ्या शिक्षण संस्थांची मान्यता रद्द, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा
tuition fees, scheme, Government,
दर महिन्याला ६ ते १० हजार विद्यावेतन, सरकारची आणखी एक योजना
27 female students were illegally kept on rent in the girls hostel of Government Engineering College Chandrapur
कमालच आहे राव… प्राध्यापिकांनी वसतिगृहात चक्क २७ विद्यार्थिनींना भाड्याने ठेवले
mumbai high court
विशेष मुलांसाठी शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करण्याचे काय झाले? उच्च न्यायालयाची केंद्र-राज्य सरकारला विचारणा
Barty awarded contracts to institutes with no experience in JEE and NEET exam coaching Nagpur
‘जेईई’,‘नीट’चा अनुभव नसणाऱ्या संस्थांना विनानिविदा कंत्राट; ‘बार्टी’च्या संस्था निवडीच्या…
nmc denies mbbs permission to 8 proposed medical colleges in maharashtra
राज्यातील आठ वैद्याकीय महाविद्यालयांना प्रवेशमनाई; अपुरी यंत्रसामग्री, मनुष्यबळाचा अभाव असल्याचा ठपका
Candidates will have to wait for professor recruitment pune
प्राध्यापक भरतीची रखडपट्टी… उमेदवारांना करावी लागणार प्रतीक्षा

हेही वाचा >>>नाशिक: दहावीचे गुणपत्रक, दाखले देण्यास अडवणूक; शिक्षणाधिकाऱ्यांचा कारवाईचा इशारा

विभागाच्या अखत्यारीतील अनुदानित आणि नामांकित शाळांमध्ये नववीत जितकी मुले असल्याचे दाखवून अनुदान घेतले जाते. प्रत्यक्षात दहावीत तितकी मुले परीक्षॆला बसतच नसल्याचे निदर्शनास आले आहे. नववीतील संख्येप्रमाणे मुले जर दहावीच्या परीक्षेला बसली नाहीत, तर तफावतीतील दहा वर्षाच्या अनुदानाची रक्कम संबंधितांकडून वसूल केली जाईल, असे डॉ. गावित यांनी सांगितले.

डॉ. गावित यांच्या हस्ते भालेर, वाघाळे आणि लोय येथे मुलांचे वसतिगृह आणि आश्रमशाळेचे लोकार्पण झाले. यावेळी शासन विद्यार्थ्यांना उत्तम सुविधा देण्यात कुठेही कमी पडत नसल्याने आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा देखील सुधारायला हवा, असा सज्जड दमच त्यांनी शिक्षकांना दिला.