नाशिक – सटाणा तालुक्यातील मुंजवाड येथील महात्मा जोतिबा फुले शिक्षण संस्था संचलित जनता विद्यालयात मंगळवारी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त तब्बल ११ हजार स्क्वेअर फुटात रांगोळीव्दारे सावित्रीबाई यांची प्रतिमा काढून अभिवादन करण्यात आले. ही रांगोळी पाहण्यासाठी दिवसभर गर्दी सुरु होती. सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रम पार पडले. संस्था, पक्ष, संघटनांच्या वतीने प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.

हेही वाचा >>>गद्दारांना घरातून निघणे मुश्किल करू, ठाकरे गटाचे बबन घोलप यांचा इशारा

Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई

मुंजवाड येथील जनता विद्यालयाने मात्र अनोख्या पद्धतीने सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केले. संस्थेचे अध्यक्ष गोकुळ जाधव, सचिव तुकाराम सूर्यवंशी, मुख्याध्यापक एस. आर. जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार कलाशिक्षक दिगंबर अहिरे यांनी विद्यालयाच्या मैदानावर ११ हजार स्क्वेअर फुटाची रांगोळी काढण्याचे ठरविले. तीन दिवस अथक परिश्रम करून रांगोळी पूर्ण करण्यात आली. यासाठी त्यांना तब्बळ २०५० किलो रांगोळी लागली. या कामगिरीसाठी कलाशिक्षक आहिरे यांना विद्यालयातीलच आठ शिक्षक, शिक्षिका आणि ३० विद्यार्थ्यांचेही सहकार्य लाभले. ही विक्रमी कलाकृती पाहण्यासाठी विद्यालयाच्या आवारात मोठी गर्दी झाली.