पुरुषांना बंदीच; पण प्रदोष काळात परवानगी
प्रदोष पूजेसाठी पुरुषांना गर्भगृह खुले; त्र्यंबकेश्वर देवस्थानची माहिती
त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात पुरुषांना दर्शनासाठी बंदी घालण्यावर विश्वस्त मंडळ अद्यापही ठाम आहे ; परंतु प्रदोष काळातील पूजेसाठी पुरुष व पुरोहितांना गर्भगृहात प्रवेश मिळेल याविषयी आधीच नियोजन करण्यात आल्याचा खुलासा देवस्थानने केला आहे, तसेच उच्च न्यायालयाकडून या संदर्भातील कागदपत्रे मिळाल्यानंतर त्याचा अभ्यास करीत या विषयी योग्य निर्णय घेण्यात येईल, असे विश्वस्तांकडून सांगण्यात आले.
सध्या राज्यात शनिशिंगणापूर येथे चौथऱ्यावर जाऊन महिलांना देवताचे दर्शन घेऊ देण्याच्या मुद्दय़ावर सुरू झालेला वाद आणि न्यायालयाने दिलेला निकाल, त्याची अंमलबजावणी होत असताना उद्भवणारे वाद या सर्वाचा विचार करत त्र्यंबक देवस्थानने पुरुषांनाही गर्भगृहातील प्रवेशास बंदी केली. याचा निषेध म्हणून सोमवारी त्र्यंबक ग्रामस्थांनी देवस्थान कार्यालयावर मोर्चा काढत या निर्णयाविरोधात निषेध नोंदविला. या नाटय़मय घडामोडीत देवस्थानच्या निर्णयाची पूर्ण बाजू न ऐकल्यामुळे ग्रामस्थांमध्ये गोंधळाची स्थिती झाली; पण आता त्यांच्याही शंकाचे निरसन होत आहे.
प्रदोष काळातील पूजेसाठी पुरुषांना गर्भगृहात प्रवेश मिळेल ही बाबही स्पष्ट झाली. या विषयी देवस्थानच्या विश्वस्तांनी गर्भगृहात पुरुषांना दर्शनासाठी बंदी हा निर्णय आणि उच्च न्यायालयाचा निकाल यांचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले आहे. मे २०१५ मध्ये या संदर्भात पुरातत्त्व विभाग आणि पोलीस विभागाने केलेल्या आवाहनानुसार, सुरक्षिततेच्या दृष्टीने काही उपाय योजले जात आहेत. गर्भगृहाची रचना पाहता काही अनुचित प्रकार घडल्यास मदत कार्य तातडीने करता यावे यासाठी गर्भगृहातील गर्दी टाळण्यासाठी दिवसभर असणारे दर्शन एक तासावर आणण्यात आले होते. आता त्या पुढील पाऊल उचलले गेले आहे.
गर्भगृहाचा आकार, गर्दी पाहता या ठिकाणी पुरुषांनाही बंदी करण्यात आली, मात्र त्यात कुठलीही परंपरा खंडीत होऊ नये यासाठी बैठकीत दररोज सायंकाळी होणारी प्रदोष पूजा. ज्यात देवाला फुलांची आरास, पुष्प पूजा आणि एकादशीच्या दुसऱ्या दिवशी येणारा प्रदोष यात सुरू असलेले व्रत- वैकल्य यांचा विचार करत या कालावधीत पुरुषांना पूजेसाठी गर्भगृह खुले राहील.
देवस्थानने ग्रामस्थांसमोर भूमिका स्पष्ट केली, तसेच महिला प्रवेश वा पूजेचा बाऊ करण्यात येत असेल तर देवस्थानच्या अध्यक्षा महिला आहेत. त्यांनी महिलांच्यावतीने प्रातिनिधीक स्वरूपात त्र्यंबकराजाची पूजा करावी, असेही विश्वस्तांकडून सांगण्यात आले.

त्र्यंबकेश्वर मंदिरातील गर्भगृहात पुरुषांना प्रवेशास बंदी ही सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आली आहे. स्त्री-पुरुष असा लिंगभेद या ठिकाणी नाही. न्यायालयाचे या संदर्भातील आदेश अद्याप प्राप्त झालेले नाहीत. ते कागदपत्र मिळाल्यानंतर त्याचा अभ्यास करत योग्य निर्णय होईल. तसेच ८ एप्रिल रोजी देवस्थानची बैठक असून त्यात या सर्व घडामोडींचा विचार करत मुक्त प्रवेशाचा विचार होणार असून त्यात स्त्रियांबाबत ठोस भूमिका घेण्यात येईल. प्रवेश खुला होणार असेल तर या ठिकाणी महिलांनाही मुक्त प्रवेश मिळेल.
-डॉ. सत्यप्रिय शुक्ल त्रिकाल पूजक व विश्वस्त

crime
मंदिरात जिवंत नागपूजा, पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
buldhana, bear, three cubs, temple, dongarshewali village,chikhali tehsil, viral video,
VIDEO : अस्वलाचे कुटुंब मंदिरात आले; पिंडीजवळ थांबले, प्रसाद खाल्ला आणि….
shri krushna dwarka
श्रीकृष्णाची द्वारका खरंच पाण्याखाली आहे का? दंतकथा आणि पुरावे काय सांगतात? वाचा सविस्तर…
tipeshwar sanctuary, archi tigress, cubs, attracting tourists, viral video, yavatmal, nagpur,
VIDEO : टिपेश्वरच्या जंगलात “आर्ची” आणि तिच्या बछड्याने पर्यटकांना लावले वेड