नाशिक – सातपूर येथील शिवाजीनगर भागातील एका बांधकामस्थळी खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. या घटनेसंदर्भात माजी महापौर दशरथ पाटील यांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

शिवाजीनगरात छत्रपती शिवाजी महाराज मनपा विद्यालयाच्या रस्त्यावरील गुरुद्वाराजवळ एका खासगी व्यावसायिकाचे बांधकाम सुरु आहे. बांधकामासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. या खड्ड्यात पावसामुळे मोठ्या स्वरूपात पाणी साचले आहे. सोमवारी सायंकाळी १२ ते १५ वर्ष वयाची चार ते पाच मुले खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेली. पैकी अंकुश गाडे ( १५, रा. शिवाजीनगर जलकुंभ) आणि प्रणव सोनटक्के ( १५, रा. अथर्व सुपर मार्केट) या दोघांचे पाय चिखलात रुतल्याने त्यांना पाण्याबाहेर येता आले नाही. दोघांचा बुडून मृत्यू झाला. दोघेही जनता विद्यालयात इयत्ता नववीमध्ये एकाच वर्गात शिकत होते. साडेपाच वाजता शाळेतून घरी आल्यानंतर मित्रांबरोबर पोहायला गेले होते. दोघे पाण्यात बुडत असल्याचे इतर मुलांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड करुन मदतीसाठी प्रयत्न केले. नागरिकांनी अग्निशमन विभागाला कळविल्यानंतर अग्निशमनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पाण्यात गळ टाकून मृतदेहाचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. जीवरक्षक संदीप गुंबाडे आणि इतरांनी पाण्यात उड्या घेऊन दोघांचे मृतदेह बाहेर काढले.

vandalized vehicles Pimpri Chinchwad, Pimpri-Chinchwad latest news,
पिंपरी-चिंचवड: १४ वाहनांची तोडफोड करणाऱ्या ‘त्या’ आरोपींची पोलिसांनी काढली धिंड
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
person who stole jewellery from devotees was arrested in Lalbagh
लालबागमध्ये भाविकांचे दागिने चोरणाऱ्याला अटक, आरोपी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी
buffaloes dies due to lightning strike in dam
पाण्यात विजेचा प्रवाह उतरल्याने बंधार्‍यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या चार म्हशींचा दुर्दैवी मृत्यू
young man stabbed to death in gultekdi
पुणे: गुलटेकडीमध्ये मध्यरात्री तरुणावर वार करुन निर्घुण खुन,भावाला वाचवायला गेला आणि जीव गमावला, पाच जणांना अटक
Two young man died by drowning during wash bulls
बैल धुण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा मृत्यू! पोळा सणावर शोकाचे सावट
leopard attacks in shirur woman dies in leopard attacks in Jambut
शिरुरमध्ये बिबट्यांचे हल्ले; जांबूतमध्ये महिलेचा मृत्यू, कान्हूर मेसाई गावात एकजण जखमी
A cage has been set up to imprison leopards at Dhagae Vasti Pune print news
ढगे वस्ती येथे बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे; विबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

हेही वाचा >>>नाशिक : अंबड, इंदिरानगरातील सोनसाखळी चोरीचे १४ गुन्हे उघड, साडेसतरा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

दरम्यान, याप्रकरणी दुसऱ्या दिवशीही कोणीही तक्रार न दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. तक्रार प्राप्त झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती सातपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रणजित नलावडे यांनी दिली. माजी महापौर दशरथ पाटील यांनी दोन्ही बालकांच्या घरी जाऊन कुटूंबियांचे सांत्वन केले. संबंधित बांधकाम व्यावसायिकाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. दोन बालकांचा मृत्यू होऊनही या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचे दिसून आले.