नाशिक : जिल्ह्यात मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाटात गुरुवारी झालेल्या अपघातात दोन जैन साध्वींचा मृत्यू झाला. कसारा घाटातील हॉटेल आँरेजसमोर पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. कसारा घाटातून नाशिक येथील पवननगर स्थानकात चातुर्मास कार्यक्रमासाठी सिद्धाकाजी आणि हर्षाईकाजी महाराज या नाशिककडे पायी प्रवास करुन येत होत्या. कसारा घाटात त्या आल्या असता एका कंटेनरने खासगी मालवाहू वाहनाला आणि कारला धडक दिली. त्यानंतर पायी चालणाऱ्या महिला साध्वींना धडक बसली. या अपघातात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. इगतपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.