Two killed and 25 injured in bus accident carrying wedding bridegroom in dhule | Loksatta

धुळे: लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसला अपघात; दोघांचा मृत्यू तर २५ जण जखमी

चालकाचा ताबा सुटल्यामुळे बस उलटली. या अपघातात एका महिलेस १२ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे.

धुळे: लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसला अपघात; दोघांचा मृत्यू तर २५ जण जखमी
कात्रज-कोंढवा रस्त्यावर वीज अभियंत्याच्या हलगर्जीमुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू (प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता)

धुळ्यातील साक्री तालुक्यातील भडगाव बारीत लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक महिला आणि एका मुलीचा मृत्यू झाला आहे. तसेच २५ वऱ्हाडी जखमी झाले आहेत. चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे.

हेही वाचा- अमरावती: बेपत्‍ता उच्चशिक्षित युवतीचा पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह

पोलीस शिपाई मंगेश खैरनार यांनी दिेलेल्या तक्रारीनुसार चिंचवे गावातून साक्री येथे लग्नासाठी शालेय बसमधून वऱ्हाड निघाले होते. भडगाव ते मालेगाव रस्त्यावरील भडगावजवळील बारीत चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली. या अपघातात मखमलबाई ह्याळीज (६२, रा.सायना, मालेगाव), मयुरी बोरसे (१२, शिर्डी) या दोघांचा मृत्यू झाला. बसमधील इतर २५ वऱ्हाडी जखमी झाले आहेत. या अपघातासंदर्भात साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 16:14 IST
Next Story
मालेगाव: बंदिस्त कालव्याविरोधातील आंदोलकाचा विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न