नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात पडल्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा – आगामी कुंभमेळ्यासाठी पुरेसा निधी देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
हेही वाचा – नाशिकमध्ये उद्यापासून राज्य संस्कृत नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी
श्यामकांत खैरनार (३५) हे एकलहरे शिवारात शेतीला पाणी भरत होते. पाणी भरत असतांना तोल गेल्याने ते विहीरीत पडले. हा प्रकार परिसरातील नागरीकांच्या लक्षात येताच नामपूर ग्रामीण रुग्णालयात खैरनार यांना दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत भिका आव्हाड (४५) हे पाटावर धुणे धुण्यासाठी गेले होते. त्यांचा पाय घसरल्याने ते पाटाच्या पाण्यात पडले. त्यांना येवला उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.