नाशिक: पाण्यात पडल्याने दोन जणांचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला.

boy drowned
पाण्यात पडल्याने दोन जणांचा मृत्यू (प्रातिनिधिक छायाचित्र)

नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाण्यात पडल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.पंकज देशमुख (२०, रा. जोपुळ रोड) हा गतीमंद युवक काही दिवसांपूर्वी घरातून निघून गेला होता. त्यानंतर तो चिंचखेड चौफुली येथे पाटाच्या पाण्यात पडलेला मिळून आला. त्याला पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

दुसरी घटना कळवण तालुक्यात घडली. योगेश मार्कंड हा भेंडी शिवारातील पाझर तलाव येथे मेंढ्याना पाणी पाजण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरल्याने तलावात पडला. बुडून त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कळवण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 20:21 IST
Next Story
थकबाकीमुळे विद्यालयाविरुद्ध धुळे मनपाची कारवाई
Exit mobile version