मालेगाव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी तालुकाप्रमुख रामा मिस्तरी यांनी पक्ष सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे ठाकरे गटाला मालेगावात धक्का बसला आहे. अविभाजित शिवसेनेत मिस्तरी यांनी अनेक वर्षे मालेगाव महानगरप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती. शिवसेनेतील फुटीनंतर मालेगावातील बहुसंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. मिस्तरी हे मात्र ठाकरे गटातच राहिले. ठाकरे गटाने त्यांना तालुकाप्रमुख केले.

हेही वाचा >>> Malegaon Central : मुस्लीम समाजाचं वर्चस्व असलेल्या मालेगाव मध्य मतदारसंघाची पार्श्वभूमी काय आहे?

nashik anti narcotics squad seized md drug stock worth five lakh rupees
नाशिकरोडमध्ये वाहनातून अमली पदार्थाचा साठा जप्त – दोघांसह महिलेविरुध्द गुन्हा
howrah mumbai mail bomb
Mumbai-Howrah Mail Bomb Threat: हावडा-मुंबई मेल बॉम्बने उडवण्याची…
nashik protest for drinking water
पाणी प्रश्नी नाशिक महापालिकेवर महिलांची शहर बसमधून धडक, प्रवेशद्वारावर हंडे आपटून निषेध
manoj jarange chagan bhujbal supporters clash
नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील-छगन भुजबळांचे समर्थक भिडले; शिवसृष्टी परिसरात तणावाचे वातावरण!
police officer beats son, police officer family dispute,
कौटुंबिक वादातून पोलीस अधिकाऱ्याची मुलास मारहाण, गुन्हा दाखल
Two firemen killed in explosion during artillery practice at Deolali Camp inquiry ordered by military
देवळालीत तोफगोळ्याचा स्फोट, लष्कराकडून चौकशीचे आदेश
Mahavitarans power distribution system is being affected by stormy windslightning and rain
परतीच्या पावसाचा वीज पुरवठ्याला फटका, गंगापूर रस्त्यावरील काही भाग २४ तास अंधारात
Jamner Vidhan Sabha Election 2024 Girish Mahajan
Jamner Assembly Constituency : निवडणुकीच्या तोंडावर वाढली अडचण, गिरीश महाजन यांच्यापुढे कोणते आव्हान?
Muktainagar Vidhan Sabha Election 2024 Chandrakant Nimba Patil
Muktainagar Assembly Constituency : चंद्रकांत पाटलांसमोर पुन्हा खडसे कुटुंबियांचे आव्हान ?

अलीकडेच, ठाकरे गटाने अचानक मिस्तरी यांचेकडील पद काढून जितेंद्र देसले यांना दिले. यामुळे मिस्तरी आणि समर्थकांमधील नाराजी उफाळून आली आहे. या नाराजीतूनच त्यांनी राजीनामा दिला. पत्रकार परिषद घेऊन मिस्तरी यांनी राजीनाम्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. आपल्याला कोणतीही पूर्वसूचना न देता आपले पद काढून घेण्यात आले असून त्यास हिरे हे जबाबदार असल्याचा आरोप मिस्तरी यांनी केला. काही दिवस पक्षापासून अलिप्त राहिलेले बंडू बच्छाव यांना गेल्या महिन्यात आपण संजय राऊत यांच्याकडे घेऊन गेलो होतो. त्यानंतर बच्छाव सक्रिय झाल्याने मालेगाव बाह्य मतदार संघात उमेदवारीसाठी प्रमुख दावेदार झाले. त्याचा हिरे यांना राग आला असावा आणि त्यातून त्यांनी आपल्याला पदावरुन काढण्यासाठी षडयंत्र रचले, असेही मिस्तरी यांनी म्हटले आहे. मिस्तरी हे शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.