“सावरकर वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवायचे, त्यांनी गोमांस…..;” शरद पवारांचं विधान

विनायक दामोदर सावरकर हिंदू धर्माकडे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायचे आणि ते दलितांसाठी मंदिर प्रवेश सुधारणांना प्रोत्साहन देणाऱ्या लोकांपैकी एक होते, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे.

sharad-pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

विनायक दामोदर सावरकर हिंदू धर्माकडे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायचे आणि ते दलितांसाठी मंदिर प्रवेश सुधारणांना प्रोत्साहन देणाऱ्या लोकांपैकी एक होते, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केले आहे. “सावरकरांनीच गाईचे मांस आणि दुधाच्या उपयुक्ततेचा पुरस्कार केला. ते विवेकवादी होते. ते या विषयावर शास्त्रीय पद्धतीने बोलायचे, ज्याला कमी लेखले जाऊ शकत नाही,” असं पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, “भाजपाने सावरकरांबद्दल विनाकारण वाद निर्माण केला आहे. सावरकरांनी रत्नागिरीत एक छोटेसे मंदिर कसे बांधले आणि विधी करण्यासाठी दलित पुजारी नेमले,” याबद्दलही पवारांनी सांगितलं. तसेच  “सावरकरांनी सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी हे केले गेले होते. त्या काळात दलितांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे मंदिराचा कारभार सोपवणे अकल्पनीय होते. अशात सावरकरांनी मंदिरात दलित पुजारी नेमले, या काही गोष्टींवरून सावरकरांचा दृष्टीकोन वैज्ञानिक होता,” हे दिसून येते असं पवार म्हणाले.

सावरकरांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान दुर्लक्षित करता येणार नाही, असेही पवार म्हणाले. महाराष्ट्रात प्रत्येक मराठी माणूस  त्यांचा आदर करतो. नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी आपल्या भाषणात शरद पवार यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, साहित्य संमेलनात सावरकरांचा उल्लेख न केल्यामुळे भाजपाचा या कार्यक्रमाशी काहीही संबंध नाही, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केल्यानंतर शरद पवार यांनी साहित्य संमेलनाच्या समारोपात सावरकरांचा उल्लेख केला. “साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी जाणीवपूर्वक सावरकरांचे नाव समाविष्ट केले नाही. जिथे सावरकरांचा अपमान होतो तिथे आम्ही कशाला जायचे?, सावरकरांनी १९३८ मध्ये साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले होते. तरीही त्यांचे नाव या अधिवेशनातून गायब आहे,” असं फडणवीसांनी म्हटलं होतं. तर, भाजपाकडून विनाकारण वाद तयार केला जात असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Veer sawarkar had scientific view says sharad pawar hrc

ताज्या बातम्या