नाशिक – जिल्ह्यातील १०३ मतदान केंद्र अशा ठिकाणी आहेत की, जिथे दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनीची संपर्क व्यवस्था नाही. मतदानाच्या दिवशी तेथील माहिती प्राप्त करण्यासाठी उपग्रहाधारित फोन, पोलीस यंत्रणेकडील बिनतारी संदेश यंत्रणा आणि धावपटूंचा (रनर) वापर केला जाणार आहे. संबंधित केंद्रावरील मतदानाची माहिती जिथे भ्रमणध्वनीचा संपर्क होत असेल, अशा ठिकाणी धावपटू जावून निवडणूक शाखेला पाठवतील. अशा ८८ केंद्रांवर धावपटूंचा वापर करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील १५ मतदारसंघात केंद्रांची संख्या एकूण ४९१९ असून या ठिकाणी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. प्रत्येक केंद्रावरील मतदानाची टक्केवारी दर दोन-तीन तासांनी निवडणूक शाखेकडून आयोगाला दिली जाते. विधानसभानिहाय मतदानाची आकडेवारी जलदपणे मिळण्यासाठी बहुतांश केंद्रांवर विविध पर्याय उपलब्ध आहेत. सध्या अस्तित्वातील केंद्रांपैकी ४८१६ केंद्रांवर भ्रमणध्वनीची संपर्क व्यवस्था आहे. केवळ ११ केंद्रांवर दूरध्वनी यंत्रणेची संपर्क व्यवस्था आहे. दूरध्वनीची व्यवस्था असणारे सर्व केंद्र कळवण तालुक्यातील आहेत. दूरध्वनी आणि भ्रमणध्वनीची व्यवस्था नसणारे जिल्ह्यात १०३ (शॅडो) मतदान केंद्र असल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली. या केंद्रांवरील मतदानाची माहिती मिळविण्यासाठी पर्यायी व्यवस्थेचे नियोजन निवडणूक शाखेने केले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा – शेतकरी सुखी आहे का ? उद्धव ठाकरे यांचा प्रश्न

कुठलीही संपर्क व्यवस्था नसलेल्या केंद्रांवरील माहिती प्राप्त करण्यासाठी सॅटेलाईट फोन, पोलिसांची बिनतारी संपर्क यंत्रणा आणि धावपटू (रनर) हे पर्याय वापरले जाणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी सांगितले. प्रशासनाकडे १० उपग्रहाधारित फोन आहेत. काही केंद्रांवर त्यांचा वापर केला जाईल. ८८ केंद्रांवर धावपटूंचा वापर केला जाणार आहे. म्हणजे संपर्क नसलेल्या केंद्रांवर धावपटू नियुक्त केले जातील. केंद्रांवरील मतदानाची आकडेवारी व तत्सम माहिती हे धावपटू जिथे भ्रमणध्वनीशी संपर्क होत असेल, तिथे पोहोचून निवडणूक शाखेकडे पाठवतील. दिवसभरातील माहिती अशाप्रकारे संकलित करावी लागणार आहे. पाच तालुक्यांमध्ये दुर्गम भागात अशी मतदान केंद्र आहेत. मतदानाच्या दिवशी तेथील माहिती मिळविण्यासाठी उपरोक्त पर्यायी मार्गांचा अवलंब केला जाणार आहे.

हेही वाचा – नाशिक : देवळालीत महायुतीतील मतभेद मिटता मिटेना, अजित पवार गटाविरोधात शिंदे गटाचा प्रचार

तालुकानिहाय संपर्कहिन मतदान केंद्रांची संख्या

बागलाण – १८

कळवण – ३८

चांदवड – चार

दिंडोरी – २४

इगतपुरी – १९

Story img Loader