नाशिक : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी ४४ प्रभागांतील प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. प्रभाग क्रमांक एक, दोन, सात, २४, २६, १४ , ३७ , ३९ आणि ४० या प्रभागांतील मतदार संख्येत मोठे फेरबदल झाले आहेत. संपूर्ण शहरात प्रभाग क्रमांक ४० मध्ये सर्वात कमी म्हणजे ७१४३ मतदार होते. तेथील मतदारांची संख्या वाढून आता नऊ हजार ६२२ वर गेली आहे. महापालिकेने चार प्रभाग मिळून एक असे एकूण उपजिल्हाधिकारी संवर्गातील १० निवडणूक निर्णय अधिकारी आणि आचारसंहिता कक्षासाठी प्रमुख म्हणून अधिकारी देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

प्रभागनिहाय मतदार यादी गेल्या महिन्यात प्रसिद्ध झाली होती. त्यात अनेक प्रभागांतील काही विशिष्ट भागातील नावे थेट दुसऱ्या प्रभागात समाविष्ट केल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. भाजपने तर महाविकास आघाडीवर घोळाचे खापर फोडत अधिकारी आणि काही राजकीय नेत्यांनी संगनमताने हा घोळ केल्याची तक्रार केली होती. याबाबत तब्बल साडेतीन हजार हरकती प्राप्त झाल्या होत्या. शेकडो कर्मचारी जुंपून त्यांची युद्धपातळीवर चौकशी केली गेली. अमान्य झालेल्याला वगळून मान्य झालेल्या हरकतीनुसार प्रारूप मतदार यादीत बदल करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले. याद्या नागरिकांना पाहणीसाठी विभागीय कार्यालय तसेच राजीव गांधी भवन मुख्यालय येथे कार्यालयीन दिवशी ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, मतदार याद्यांची राजीव गांधी भवन येथून विक्री होणार आहे. मतदार यादीची किंमत प्रति पृष्ठ एका बाजूसाठी दीड रुपया, दोन्ही बाजूसाठी तीन रुपये यानुसार एकूण पृष्ठांची होणारी रक्कम भरणा केल्यानंतर, उपलब्ध असल्यास त्याच दिवशी, नसल्यास छपाई करुन दुसऱ्या दिवशी निवडणूक विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात येतील, असे महापालिकेने म्हटले आहे.

Mahayuti, Maval lok sabha, Maval,
मावळमध्ये महायुतीचे आज शक्तिप्रदर्शन
onion, Dindori, loksabha election 2024,
दिंडोरीत कांदा प्रचाराच्या केंद्रस्थानी
election
प्रचाराची सांगता; लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा, विदर्भातील पाच मतदारसंघांत उद्या मतदान
prakash ambedkar, vanchit bahujan aghadi, nomination, akola loksabha constituency, election 2024
ॲड. प्रकाश आंबेडकरांचा अर्ज दाखल, अकोल्यात वंचितचे जोरदार शक्तिप्रदर्शन

फेरबदल कुठे, कसे?
अंतिम मतदार यादीत आठ ते दहा प्रभागांतील मतदारसंख्येत मोठे फेरबदल झाल्याचे लक्षात येते. यात प्रभाग क्रमांक एकमध्ये अंतिम यादीत ३४०८४ (प्रारूप यादीत ३१८५२), प्रभाग क्रमांक दोनमध्ये पूर्वी २९ हजार ५३४ असणारी मतदारसंख्या अंतिम यादीत २५ हजार ६३६ इतकी झाली आहे. प्रभाग क्रमांक सातमध्ये २२४३१ (२०२८७), प्रभाग १४ मध्ये ३०८५९ (३२८९७), प्रभाग २४ मध्ये २५३३१ (२३१४८), प्रभाग २६ मध्ये २७१५१ (२९२३२), प्रभाग ३७ मध्ये १९९९२ (१८१४९), प्रभाग ३९ मध्ये ३२२७१ (३४०८४) आणि प्रभाग क्रमांक ४० मध्ये ९६२२ (७१४३) याप्रमाणे मतदार संख्येत फेरबदल झाले आहेत. अंतिम यादीनुसार शहरात एकूण मतदारांची संख्या १२ लाख ३७२ इतकी आहे. यात सहा लाख २९ हजार ६८२ पुरुष तर, पाच लाख ७० हजार ६३६ महिला मतदार आहेत.