scorecardresearch

नवीन नाशिकमध्ये बुधवारी पाणी पुरवठा बंद; जल वाहिनीची गळती दुरुस्ती केली जाणार

नवीन नाशिकमधील प्रभाग क्रमांक २४, २५, २६, २७, २८ आणि २९ मध्ये पाणी पुरवठा होऊ शकणार नाही.

water supply close
(संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता

शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रातून जलकुंभ भरण्यासह पाणी वितरण करणाऱ्या जल वाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. या वाहिनीची बुधवारी दुरुस्ती केली जाणार असल्यामुळे त्या दिवशी नवीन नाशिकमधील प्रभाग क्रमांक २४, २५, २६, २७, २८ आणि २९ मध्ये पाणी पुरवठा होऊ शकणार नाही.

याबाबतची माहिती मनपाच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. काही दिवसांपासून पाणी पुरवठ्यात वेगवेगळ्या समस्या उद्भवत आहेत. वाहिनीच्या गळतीचे प्रकार वाढत आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी त्या त्या भागात पाणी पुरवठा बंद ठेवावा लागत आहे. आता नवीन नाशिक भागात पाणीबाणीला तोंड द्यावे लागणार आहे.

शिवाजीनगर जलशुध्दीकरण केंद्रातून ९०० मिलीमीटरच्या जल वाहिनीद्वारे प्रभाग २७, २५ आणि २६ (अंशत:) मधील जलकुंभास आणि इतरत्र पाणी पुरवठा केला जातो. अंबडजवळ या जल वाहिनीला गळती लागल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या वाहिनीचे दुरुस्ती काम एक फेब्रुवारी रोजी हाती घेतले जाणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाने म्हटले आहे. त्यामुळे नवीन नाशिकमधील सहा प्रभागात सकाळ, दुपार व सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. गुरूवारी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होणार आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.

कोणत्या भागात पाणी पुरवठा बंद ?

प्रभाग क्रमांक २४ मधील कालिका पार्क, उंटवाडी परिसर, प्रभाग २५ मधील इंद्रनगरी, पवननगर, माऊली लॉन्स, सावतानगर, त्रिमूर्ती चौक, कोकण भवन, कामटवाडे गाव व परिसर. प्रभाग २६ मधील मोगलनगर, साळुंकेनगर, वावरेनगर, शिवशक्तीनगर आणि चौक, आयटीआय, खुटवडनगर, मटालेनगर, आशीर्वादनगर, संजीवनगर, जाधव संकुल, पाटील पार्क, विरार संकुल. प्रभाग २७ मधील अलीबाबा नगर, दातीर वस्ती, अंबडगाव, हुजेफा फर्निचर, ग्लोबल व्हिजन शाळा व परिसर, प्रभाग २८ मधील लक्ष्मीनगर, अंबड गाव ते माऊली वृंदावननगर, माऊली लॉन्स, अंबड गाव, साई लॉन्स, ग्रामनगर, उपेंद्रनगर, महाजननगर, सहावी स्कीम, प्रभाग २९ मधील भाद्रपद सेक्टर, आझाद पंछी परिसर, शनी मंदिर, मोरवाडी गाव व आसपासच्या भागात बुधवारी पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 20:07 IST
ताज्या बातम्या