नाशिक – शहराच्या पूर्व विभागातत गुरुवारी पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने महिला वर्गाची धावपळ उडाली. बुधवारी रात्री उशीराने मुकणे धरण परिसरात नाशिक पूर्वला पाणीपुरवठा करणाऱ्या व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाला. यामुळे सिडको, पाथर्डी, सातपूरसह इतर भागात सकाळी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. पाणी पुरवठा होणार नसल्याची कुठलीच पूर्वकल्पना नसल्याने सर्वाची धावपळ झाली. सकाळी नगरसेवकांकडून याबाबत भ्रमणध्वनीद्वारे लघुसंदेशाद्वारे माहिती दिली गेली.

याविषयी पाणी पुरवठा अधिकारी गोकुळ पगारे यांनी माहिती दिली. मुकणे धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्याचे काम गुरुवारी दुपापर्यंत सुरू होते. बुधवारी शहर परिसरात संततधार सुरु राहिली. रात्री उशीरापर्यंत पाऊस सुरू होता. पावसामुळे काही ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटल्या.