शहराच्या पूर्व विभागात पाणीपुरवठा विस्कळीत

शहराच्या पूर्व विभागातत गुरुवारी पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने महिला वर्गाची धावपळ उडाली.

नाशिक – शहराच्या पूर्व विभागातत गुरुवारी पाणी पुरवठा विस्कळीत झाल्याने महिला वर्गाची धावपळ उडाली. बुधवारी रात्री उशीराने मुकणे धरण परिसरात नाशिक पूर्वला पाणीपुरवठा करणाऱ्या व्हॉल्व्हमध्ये बिघाड झाला. यामुळे सिडको, पाथर्डी, सातपूरसह इतर भागात सकाळी पाणीपुरवठा होऊ शकला नाही. पाणी पुरवठा होणार नसल्याची कुठलीच पूर्वकल्पना नसल्याने सर्वाची धावपळ झाली. सकाळी नगरसेवकांकडून याबाबत भ्रमणध्वनीद्वारे लघुसंदेशाद्वारे माहिती दिली गेली.

याविषयी पाणी पुरवठा अधिकारी गोकुळ पगारे यांनी माहिती दिली. मुकणे धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या व्हॉल्व्हमध्ये झालेला बिघाड दुरुस्त करण्याचे काम गुरुवारी दुपापर्यंत सुरू होते. बुधवारी शहर परिसरात संततधार सुरु राहिली. रात्री उशीरापर्यंत पाऊस सुरू होता. पावसामुळे काही ठिकाणी झाडाच्या फांद्या तुटल्या.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नाशिक बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Water supply disrupted city ysh

ताज्या बातम्या