नाशिक : सातपूर, सिडको आणि नाशिक पश्चिम भागातील जलकुंभ भरणाऱ्या १२०० मिलिमीटर व्यासाच्या वाहिनीला गळती लागली आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम बुधवारी हाती घेतले जाणार असल्याने या दिवशी सातपूर, सिडको आणि नाशिक पश्चिममध्ये पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेने म्हटले आहे. गुरुवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

सातपूर विभागातील शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातून विविध भागांतील जलकुंभ भरणारी ही वाहिनी आहे. तिची सातमाऊली चौक, मिहद्रा कंपनी संरक्षक भिंतीलगत आणि त्र्यंबक रस्त्यावरील डेमोक्रेसी मंगल कार्यालय चौकात गळती सुरू आहे. पाण्याचा अपव्यय टाळून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तिची दुरुस्ती तातडीने करण्याची गरज पाणीपुरवठा विभागाने मांडली. बुधवारी जलवाहिनीची दुरुस्ती केली जाणार आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण सातपूर विभागासह सिडको, नाशिक पश्चिम विभागातील काही प्रभागात पाणीपुरवठा होणार नाही. यामध्ये सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक आठ, नऊ, १०, ११, २६ आणि प्रभाग २७ मधील चुंचाळे, दत्तनगर, माऊली चौक यांचा समावेश आहे.

नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक सातमधील नहुष सोसायटी परिसर, पूर्णवादनगर, दादोजी कोंडदेवनगर, अरिहंत नर्सिग होम परिसर, आकाशवाणी केंद्र, तिरुपती टाऊन, सहदेवनगर, सुयोजित गार्डन, आयचित नगर, गीतांजली सोसायटी, पिम्पग स्टेशन, शांती निकेतन आदी, प्रभाग १२ मधील महात्मानगर जलकुंभ परिसर, पारिजातनगर, समर्थनगर, कामगारनगर, सुयोजित गार्डन, वनविहार कॉलनी, उत्कर्ष कॉलनी, लव्हाटेनगर, पत्रकार कॉलनी, पीटीसी, संभाजी चौक, उषाकिरण सोसायटी, क्रांतीनगर, श्रीमंडळ जलकुंभ परिसर, तिडके कॉलनी, राहुलनगर, मिलिंदनगर, कुटे मार्ग, चांडक सर्कल परिसर, तूपसाखरे लॉन्स, मातोश्रीनगर, सहवासनगर,ोलिकानगर, गडकरी चौक आणि गायकवाडनगर परिसर.

तसेच सिडकोतील प्रभाग

क्रमांक २५ मधील इंद्रनगरी, कामटवाडा, धन्वंतरी महाविद्यालय, महालक्ष्मी नगर, दत्तनगर, मटालेनगर, प्रभाग २६ मधील शिवशक्तीनगर, आयटीआय पूल, बॉम्बे टेलर परिसर, प्रभाग २७ मधील चुंचाळे घरकुल योजना, दातीर मळा, अलीबाबानगर, अंबड मळे परिसर, प्रभाग २८ मधील खुटवडनगर, माऊली लॉन्स, वावरेनगर, अंबड गांव, महालक्ष्मीनगर या परिसरातही बुधवारी पाणीपुरवठा होणार नाही. गुरुवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.