करोना एकल महिला पुनर्वसन समितीचे सर्वेक्षण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : राज्यातील २३ जिल्ह्यांत करोनामुळे विधवा झालेल्या ४०१३ महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले असता कोणत्याच शासकीय योजना नीटपणे त्यांच्यापर्यंत  पोहोचल्या नसल्याचे आढळून आल्याचे निरीक्षण करोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी यांनी नोंदविले आहे. समितीच्या वतीने नाशिकसह २३ जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी घरोघर संपर्क करत करोनामुळे विधवा झालेल्यांची माहिती संकलित केली. त्या माहितीचे शास्त्रीय विश्लेषण अभ्यासक दीपाली सुधींद्र यांनी केले. या माहितीच्या आधारे समितीचे कार्यकर्ते या महिलांना विविध योजना मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वेक्षण केलेल्या एकूण ४०१३ पैकी २१ ते ५० वयोगटातील महिला ८० टक्के आहेत. त्यातही ३० वर्षांपेक्षा कमी वयोगटाच्या महिला १५ टक्के आहेत.यावरून  तरुण विधवांची संख्या अधिक असल्याचे लक्षात येते. यातील फक्त ३८ टक्के महिलांकडेच शेती आहे. उर्वरित महिलांना शेती नसल्याने उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नाही. ज्यांना शेती आहे ते क्षेत्रही खूपच कमी आहे. एक एकर क्षेत्र असलेली संख्या १७ टक्के, एक ते दोन एकर क्षेत्र असलेली संख्या ३० टक्के आणि दोन ते तीन एकर असलेली संख्या ही २४ टक्के आहे. सिंचनाची सोय अत्यल्प ठिकाणी आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Widows deprived government schemes ysh
First published on: 14-01-2022 at 01:39 IST