scorecardresearch

जळगाव : जिल्हाध्यक्षांविरोधातील कारवायांची नोंद घेणार; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा इशारा

भाजपाला राष्ट्रवादीचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता घ्यावा लागतो. त्याशिवाय भाजपाकडे पर्याय नाही, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधकांना लगावला. 

Jayant Patil
Jayant Patil

जळगाव – पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या विरोधात कारवाया झाल्या आहेत, याची नोंद घेतली जाईल. सहकार क्षेत्रातील जिल्हा दूध उत्पादक संघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या पक्षीय निवडणुका नसतात. यात मात्र पक्षाची बदनामी झाली आहे. भाजपाला राष्ट्रवादीचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता घ्यावा लागतो. त्याशिवाय भाजपाकडे पर्याय नाही, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विरोधकांना लगावला. 

पाटील यांनी शहरातील आकाशवाणी चौकातील पक्षाच्या जिल्हा कार्यालयात जळगाव ग्रामीण मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. जिल्हा बँक निवडणुकीत संजय पवार यांनी पक्षाविरोधात काम केल्याच्या मुद्यावर प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी त्याविषयी पक्षनेत्यांना माहिती दिली असल्याचे सांगितले. जिल्हाध्यक्षांच्या विरोधात कारवाया झाल्या असल्याचे पाटील यांनी मान्य केले. शिंदे गटासोबत गेल्याने भाजपाला सर्वाधिक फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणाच्या प्रभावाखाली काम करीत आहेत, हे महाराष्ट्र पाहत असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच खऱ्या अर्थाने राज्याचा गाडा हाकत असून, शिंदे हे नावापुरते मुख्यमंत्री आहेत, अशी टीका पाटील यांनी केली.

हेही वाचा – नाशिक : सावरकर मुद्यावरून शिवसेनेकडून विनापरवानगी फलकबाजी; ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न

हेही वाचा – जळगाव : नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा

पाटील यांनी आगामी बाजार समित्यांसह पालिका, महापालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट महाविकास आघाडी म्हणूनच लढणार असल्याचे सांगितले. 

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-03-2023 at 14:07 IST

संबंधित बातम्या