scorecardresearch

महिला दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शहर परिसरातील सामाजिक संस्था, संघटना यांच्या वतीने महिलांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गुणवंत महिलांना गौरविण्यासह व्याख्यानांचे आयोजन; सामाजिक संस्था, संघटनांचा पुढाकार

नाशिक: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शहर परिसरातील सामाजिक संस्था, संघटना यांच्या वतीने महिलांच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुणवंत महिलांना गौरविण्यासह व्याख्यानही होणार आहे. मधुरा ट्रस्टतर्फे सन्मान सोहळा  मधुरा ट्रस्ट आणि महात्मा गांधी विद्यामंदिर संस्था यांच्या सहकार्याने मंगळवारी दुपारी ४ वाजता सार्वजनिक वाचनालयाच्या औरंगाबादकर सभागृहात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. महिलांचे सबलीकरण आणि सक्षमीकरण हा ध्यास घेऊन कार्यरत असलेल्या मधुरा वुमेन एम्पारमेंटच्या वतीने मधुरा तपस्विनी पुरस्काराचे वितरण होते. या माध्यमातून मधुरा ट्रस्टतर्फे दरवर्षी जिल्ह्यातील शिक्षण, उद्योग, कृषी, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या यशस्वी कर्तृत्ववान महिलांचा मधुरा तपस्विनी पुरस्काराने सन्मान केला जातो. यंदा पुरस्कार सोहळय़ात महिला हक्क संरक्षण समितीच्या हेमा पटवर्धन, घरकुल परिवाराच्या विद्या फडके या मार्गदर्शन करणार आहेत. नाशिककरांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

  रमाई पुरस्कार वितरण कार्यक्रम

  • प्रियदर्शी सम्राट अशोका वेल्फेअर फाऊंडेशनतर्फे मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता पाथर्डी फाटा येथील मानवसेवा वृद्धाश्रमात रमाई पुरस्कार सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिसरातील कर्तबगार महिलांना रमाई पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अध्यक्ष टी. एल. नवलसागर, उपाध्यक्ष बालाजी सावंत यांनी ही माहिती दिली.
  • अपंग वित्त व विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक रमेश बनसोड, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, समाजकल्याण साहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांबळे, शिल्पी अवस्थी, मिनू सिंघानिया, ललिता ठाकरे, सुभाष सावंत, ललिता नवलसागर आदींची प्रमुख उपस्थिती राहील. कार्यक्रमानंतर संगीत मैफल होईल.

महिला सायक्लॉथॉन, वॉकेथॉन

नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन यांच्या वतीने मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता महिला सायक्लॉथॉन आणि वॉकेथॉन तसेच नामवंत महिलांचा सत्कार आयोजित करण्यात आला आहे. भारताच्या विविध क्षेत्रांत सर्वोच्च कामगिरी केलेल्या महिलांची वेशभूषा करून वॉकेथॉन तसेच सायक्लॉथॉनमध्ये महिला सहभागी होतील. विजेत्यांना आकर्षक पारितोषिकांनी गौरविण्यात येणार आहे. प्रहार सन्मान सोहळा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मंगळवारी दुपारी तीन वाजता सातपूर येथील अन्नपूर्णा हॉटेल येथे  प्रहार सन्मान सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले आहे . या वेळी प्रहारचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Womens day various programs occasion organizing lectures initiatives social organizations ysh

ताज्या बातम्या