‘शोध’ या पहिल्याच कादंबरीने अफाट वाचकप्रियता मिळवलेले लेखक मुरलीधर खैरनार यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. साहित्यिक, नाट्यकर्मी आणि इतिहासाचे अभ्यासक म्हणून मुरलीधर खैरनार यांची ओळख होती.
खैरनार यांची एक उत्तम माहितीपट निर्माता, नाट्य अभिनेता, दिग्दर्शक, व्याख्याता व कलासंघटक म्हणून ओळख होती. त्यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, दीपक मंडळ, शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता म्हणूनही काम पाहिले होते. मुरलीधर खैरनार यांच्या याच वर्षी जुलै महिन्यात प्रकाशित झालेल्या ‘शोध’ कादंबरीने वाचकांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवली. वाचकांच्या पसंतीस पडलेल्या या कादंबरीची अवघ्या एका महिन्यात दुसरी आवृत्ती छापावी लागली.
सर्जनशील लेखनासाठी मुरलीधर खैरनार हे कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या अभ्यासवृत्तीचे मानकरी ठरले होते.
संग्रहित लेख, दिनांक 6th Dec 2015 रोजी प्रकाशित
‘शोध’ कादंबरीचे लेखक मुरलीधर खैरनार यांचे निधन
'शोध' या पहिल्याच कादंबरीने वाचकप्रियता मिळवलेले लेखक मुरलीधर खैरनार यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 06-12-2015 at 18:27 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Writer murlidhar khairnar passed away