scorecardresearch

श्रद्धास्थानांवर आक्रमण केल्यास धर्मरक्षणासाठी जशास तसे उत्तर! योगी आदित्यनाथ यांचा जामनेरमधील महाकुंभात इशारा

गोद्री महाकुंभाच्या माध्यमातून गोर बंजारा, लबाना, नायकडा व इतर पोटजातींचे एकत्रीकरण होईल.

yogi adithyanath
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

सनातन धर्म हाच खरा मानवता धर्म आहे. सनातन धर्माच्या रक्षणासाठी सर्व हिंदू समाजाने एकवटले पाहिजे. गोद्री महाकुंभाच्या माध्यमातून गोर बंजारा, लबाना, नायकडा व इतर पोटजातींचे एकत्रीकरण होईल. देशाच्या जडणघडणीत हिंदू समाजातील सर्वच लहान जाती-पोटजातींचा मोठा वाटा आहे, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले.

हेही वाचा >>>“मी अपक्ष उमेदवार आहे आणि अपक्षच राहणार; आमच्यावर आरोप काँग्रेसकडून नाही तर…” सत्यजित तांबेंनी केलं स्पष्ट!

जामनेर तालुक्यातील गोद्री येथे अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा व लबाना नायकडा समाजाच्या महाकुंभाचा समारोप सोमवारी झाला.त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था बळकट होत आहे. बळकट अर्थव्यवस्था असलेला भारत जगात पाचव्या क्रमांकावर असून, नजीकच्या काळात तिसर्‍या क्रमांकाकडे पोहोचेल यात शंका नाही, असेही त्यांनी सांगितले.व्यासपीठावर पोहरागडदेवी संस्थानचे गादीपती बाबूसिंगजी महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक भय्या जोशी, स्वामी श्यामकुमार महाराज, पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, खासदार रक्षा खडसे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्मजागरण समितीचे प्रमुख शरदराव ढोले आदी संत उपस्थित होते.

हेही वाचा >>>Nashik Graduate Constituency Election : “…त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली; विजय तर अगोदरच…” सत्यजित तांबेंचं मोठं विधान!

योगगुरू बाबा रामदेव यांनी उपस्थितांशी संवाद साधत योगकलेची प्रात्यक्षिके करून दाखविली. त्यांनी तरुणांना सिक्स पॅकचा नाद सोडण्याचे आवाहन करीत, प्रत्येकाने सकाळी उठून धावायला हवे, सकाळी विविध खेळ खेळावेत, कबड्डी, कुस्ती यांसह जे मनाला आनंद देतील असे खेळ खेळावेत, स्वास्थ्यासाठी रोज योग-प्राणायाम करा. याद्वारे शरीरावर नियंत्रण राहते. रोज सूर्यनमस्कार केल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते, असे सांगत योगगुरू बाबा रामदेव यांनी केलेल्या योगकलांना उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात उदंड प्रतिसाद दिला.महाकुंभाच्या यशस्वी आयोजनासाठी अहोरात्र परिश्रम केल्याबद्दल मंत्री महाजन यांचा धर्मपीठातर्फे सत्कार करण्यात आला. महाकुंभ आयोजनासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले, अशा मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. यात जामनेर येथील सद्गुरू आश्रामाचे प्रमुख श्याम चैतन्य महाराजांचा सत्कार करण्यात आला. यानंतर मंत्री महाजन यांचा योगी आदित्यनाथ व बाबा रामदेव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

हेही वाचा >>>ठाकरेंना ‘हिरे’ गवसल्याने शिंदे गटात अस्वस्थता

दरम्यान, महाकुंभ २५ ते ३० जानेवारीदरम्यान झाला. रोज महाकुंभात सहभागी होणार्‍या समाजबांधवांसह संत-महंत व नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. मंगळवारी (२४ जानेवारी) कुंभस्थळापासून धर्मस्थळापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली होती. यात ३० हजारांपेक्षा अधिक भाविक सहभागी झाले होते. हेलिकॉप्टरद्वारे शोभायात्रेत पुष्पवृष्टी करण्यात आली. सोमवारी दोन लाखांपेक्षा अधिक भाविक महाकुंभस्थळी आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. विशेष म्हणजे बुधवारी (२५ जानेवारी) रात्री अवकाळी पाऊस होऊनही गुरुवारी (२६ जानेवारी) बहुसंख्येने भाविक कुंभस्थळी आले होते.दरम्यान, दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाकुंभात आगमन अपेक्षित असताना खराब हवामानामुळे विमान जळगाव येथे पोहोचू शकले नाही, अशी प्राथमिक माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 19:03 IST