scorecardresearch

जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणाचा पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

भडगाव तालुक्यातील कजगाव येथील तरुणाने सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.

जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणाचा पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणाचा पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न (प्रातिनिधिक छायाचित्र)

गावातील अतिक्रमणाबाबत तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने त्रस्त झालेल्या भडगाव तालुक्यातील कजगाव येथील तरुणाने सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. भूषण पाटील असे तरुणाचे नाव आहे.

हेही वाचा – यावल अभयारण्यात अंजिरी चारुशिखी, हिरवा लगाम, सोनआमरीची नोंद, वनस्पती अभ्यासक राहुल, प्रसाद सोनवणेंचे संशोधन

हेही वाचा – नाशिक: अंबड, सातपूर प्रकल्पग्रस्त शेतकरी समस्यांच्या गर्तेत; इतर राज्यात स्थलांतरीत होण्याचा इशारा

पोलीस सूत्रांनी सांगितले की, भडगाव तालुक्यातील कजगाव येथे शासकीय जमिनीवर अतिक्रमण वाढले आहे. मात्र, काही राजकीय पुढार्‍यांमुळे या अतिक्रमणधारकांवर कारवाई केली जात नसल्याची भूषण पाटील याची तक्रार आहे. अतिक्रमण हटवून तेथे अद्ययावत बसस्थानक होईल एवढीच जागा आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाकडे पाटील याने वेळोवेळी तक्रारी केल्या. त्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झालेे. त्यामुळे त्रस्त झालेला पाटील हा सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आला. जिल्हाधिकारी कार्यालय आवारातच अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. हा प्रकार वेळीच पोलिसांच्या लक्षात आला. त्यामुळे पोलिसांनी पेट्रोल भरलेल्या कॅनसह पाटील याला ताब्यात घेतले. पाटील याला जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.

मराठीतील सर्व नाशिक / उत्तर महाराष्ट्र ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-01-2023 at 16:07 IST

संबंधित बातम्या