scorecardresearch

Premium

नाशिक: ऑनलाईन व्यवसाय शोधणे महागात; युवकाची २४ लाख रुपयांना फसवणूक

अर्धवेळ ऑनलाईन व्यवसायासाठी गुंतवणूक करणे, युवकाला महागात पडले.

online fraud
नाशिक: ऑनलाईन व्यवसाय शोधणे महागात; युवकाची २४ लाख रुपयांना फसवणूक ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता

नाशिक : अर्धवेळ ऑनलाईन व्यवसायासाठी गुंतवणूक करणे, युवकाला महागात पडले. नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी त्यास २४ लाख २५ हजार रुपयांना गंडविले. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आदित्य अहिरराव (२६, रा. अयोध्यानगरी,अमृतधाम) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. आदित्य हा तरूण गेल्या महिन्यात इंटरनेटवर आभासी पध्दतीने काही व्यवसाय करता येतो का, याचा शोध घेत होता. त्यावेळी सायबर भामट्यांनी त्याच्याशी संपर्क साधला. ९१९२६३८५५८८१ या क्रमांकावरुन संभाषण करत भामट्याने आदित्यचा विश्वास संपादन केला. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास नफा मिळवून देण्याचे आमिष दाखविले. भामट्याने वेगवेगळ्या बँक खात्यावर तसेच युपीआय आयडीच्या माध्यमातून आदित्य यास पैसे भरण्यास भाग पाडले. आदित्याने २६ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत २४ लाख २५ हजार ५०५ रुपये गुंतवले. संशयितांचा संपर्क तुटल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसात धाव घेतली. सायबर पोलीस ठाण्यात अर्ज दिल्यानंतर पोलिसांना बँक खात्यात असलेले चार लाख रुपये गोठविण्यात यश आले.

ashram school students
आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना वस्तूंचे वाटप बंद, आता होणार काय?
e-crop inspection record will be beneficial
शेतकऱ्यांनो, ई-पीक नोंदणी विसरली तर सरकारी मदत…
pune ganeshotsav 2023, 200 washrooms for ganesh devotees, 3 vanity vans for pregnant womans, free meals to police, free meal to pmc employees, pune police ganeshotsav,
पुण्यात भाविकांच्या सोयीसाठी लोकसहभागातून २०० स्वच्छतागृहे; गरोदर महिलांना आरामासाठी तीन व्हॅनिटी व्हॅन
soybean crop insurance farmers 25 percent additional amount Orders of Collectors chandrapur
सोयाबीन पीक विमाधारक शेतक-यांना मिळणार २५ टक्के अतिरिक्त रक्कम; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

हेही वाचा >>>नाशिक : कृषी विभागाच्या भरती परीक्षेत परीक्षार्थीकडे संशयास्पद साधने

नाशिक ग्रामीणमध्येही फसवणूक

फॉरेक्स मार्केट कंपनीत गुंतवणूक केल्यास अधिक पटीने परतावा देण्याचे आमिष दाखवत भामट्याने माजी सैनिक मंगेश रहाणे यांना गंडवले. रहाणे यांनी आमिषाला भुलून १६ लाख, ८२ हजार, ७९७ रुपये गुंतविले. या प्रकरणी चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Youth cheated for rs 24 lakhs in online business nashik amy

First published on: 23-09-2023 at 20:34 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×