शहरवासीयांसाठी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ मार्गदर्शनपर उपक्रम

शनिवारपासून नवरात्रोत्सव प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने गुंतवणुकीचे बचत ठेव, शेअर, सोने, घर असे कोणते पर्यायघट बसवायला हवे, हे सांगण्यासाठी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ पनवेलकरांसाठी उपलब्ध होत आहे.

नवरात्रीच्या निमित्ताने गुंतवणुकीचे नऊहून अधिक पर्यायरंग कोणते हे जाणून घेण्यासाठी ‘कोटक म्युच्युअल फंड’च्या सहकार्याने हा मार्गदर्शनपर उपक्रम होत आहे.

रविवारी, २ ऑक्टोबर २०१६ रोजी सकाळी १०.३० वाजता पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाटय़गृहात याबाबतचे दुसरे मार्गदर्शनपर सत्र होईल. कार्यक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आहे आणि प्रवेशही विनामूल्य आहे.

गुंंतवणूकदार/वाचकांना या वेळी उपस्थित तज्ज्ञ अर्थनियोजनकारांना गुंतवणुकीबाबतचे प्रश्न विचारण्याची संधी उपलब्ध असेल.

गुंतवणुकीचे नियोजन, त्यातील शिस्तबद्धता आदी महत्त्वाचे टप्पे सनदी लेखाकार तृप्ती राणे यानिमित्ताने सांगतील. ‘अर्थनियोजनातून स्वप्नपूर्ती’ या विषयाद्वारे गुंतवणुकीचे विविध पर्याय, कोणते जोखमीचे, तर कोणते निर्धोक हेही त्या सांगतील. कालांतराने खाली येत असलेले ठेवींचे दर, अचानक दरवाढ नोंदविणारे मौल्यवान धातू, स्थावर मालमत्ता क्षेत्र अशा स्थितीत गुंतवणुकीविषयी काय धोरण असावे, हेही त्या सांगतील.

तेजी-वाढीचे विरोधी रंग दाखविणाऱ्या भांडवली बाजाराकडे सद्य:स्थितीत तसेच भविष्यकालीन धोरण म्हणून कसे पाहावे, याबाबत ‘लोकसत्ता अर्थ वृत्तान्त’चे स्तंभलेखक वसंत माधव कुलकर्णी हे विशद करतील. ‘म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील फायदे’ या विषयाद्वारे ते समग्र फंड क्षेत्राचा आढावा घेतील.

केव्हा, कुठे?

रविवार, २ ऑक्टोबर २०१६ सकाळी १०.३० वाजता

स्थळ :  वासुदेव बळवंत फडके नाटय़गृह, सरस्वती विद्या मंदिरजवळ, जुन्या तहसिल कार्यालयासमोर, पनवेल, नवी मुंबई ४१० २०६

: तज्ज्ञ मार्गदर्शक :

’  तृप्ती राणे

(अर्थनियोजनातून स्वप्नपूर्ती)

’  वसंत माधव कुलकर्णी

(म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे)