28 February 2021

News Flash

करोना रुग्णांची शंभरी पार

दिवसभरात १०९ नवे रुग्ण; उपचाराधीन रुग्णही एक हजारांवर

संग्रहीत छायाचित्र

दिवसभरात १०९ नवे रुग्ण; उपचाराधीन रुग्णही एक हजारांवर

नवी मुंबई : शहरात आटोक्यात आलेली करोना परिस्थिती आता बिघडू लागली आहे. पन्नासच्या आता आलेली नव्या रुग्णांची संख्या वाढू लागली असून शुक्रवारी १०९ नवे रुग्ण सापडले आहेत. गुरुवारीही शहरात ९३ रुग्ण सापडले होते.

१ फेब्रुवारीपर्यंत शहरात करोनाची परिस्थिती अत्यंत नियंत्रणात आली होती. दररोज सापडणारे करोना रुग्ण हे ५० पेक्षा कमी झाले होते. या काळात अगदी ३० पर्यंत नव्या रुग्णांत घट झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्याबरोबर नवी मुंबईतही रुग्ण वाढत आहेत. शुक्रवारी १०९ रुग्ण सापडले आहेत. रुग्ण वाढत असल्याने उपचाराधीन रुग्णाही वाढ झाली असून ती एक हजारांपेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाला आता बंद केलेली आरोग्य सुविधा पुन्हा सुरू करावी लागणार आहे.

त्यामुळे पालिका व पोलीस प्रशासन पुन्हा सतर्क झाले असून आठ पथके शहरात करोना नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. पालिका आयुक्तांनी नुकतीच एक बैठक घेत यात सार्वजनिक गर्दीच्या कार्यक्रमांवरही निर्बंध घालण्याचे संकेत दिले आहेत. शहरातील हॉटेल, मंगल कार्यालये तसेच विविध समारंभाची ठिकाणे या ठिकाणी अचानक छापा टाकून करोनाच्या नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

रुग्णवाढ ही शहरासाठी नक्कीच धोक्याची घंटा आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यंत जबाबदारीने वागून करोनाचे नियम पाळून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.

करोना रुग्णस्थिती

तारीख       नवे रुग्ण       उपचाराधीन

१९ डिसेंबर       ७८            १००८

१९ जानेवारी      ५९            ८१२

१९ फेब्रुवारी     १०९            १००३

५४,३८७         एकूण रुग्ण

११०६            एकूण मृत्यू

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2021 12:16 am

Web Title: 109 new covid 19 patients found in navi mumbai in last 24 hours zws 70
Next Stories
1 नाईकांची ‘एसआयटी’ चौकशी व्हावी
2 पालिकेचा प्रकल्पपूर्तीचा संकल्प
3 परिवहनच्या मालमत्तांचा वाणिज्य विकास
Just Now!
X