News Flash

पनवेलमध्ये अकरा दिवसांत १२० करोना मृत्यू

महिन्याभरात पनवेल पालिका क्षेत्रातील २४,३५४ जणांना करोनाची लागण झाली तर १५७ जणांचा मृत्यू झाला

पनवेल : पनवेलमध्ये गेली दोन दिवस करोनाची परिस्थिती काहीशी आटोक्यात आल्याचे चित्र असले तरी मागील दहा दिवसांत शहरातील परिस्थिती गंभीर झाली होती. दहा दिवसांत करोनामुळे ११० जणांचा मृत्यू झाला तर ६,३०६ जणांना करोनाची लागण झाली आहे.

महिन्याभरात पनवेल पालिका क्षेत्रातील २४,३५४ जणांना करोनाची लागण झाली तर १५७ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी ११० जणांचा मृत्यू गेल्या दहा दिवसांत उपचारादरम्यान झाला आहे. पालिका आणि ग्रामीण भागात ६,४२२ जण करोनावर उपचार घेत आहेत. यातील ७५ टक्के नागरिक हे घरूनच उपचार घेत आहेत. ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग झाला नव्हता. मात्र हळदी व लग्नसमारंभामुळे करोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात झाला आहे. महिन्याभरापूर्वी ग्रामीण भागात दिवसाला ५० ते ६० जण बाधित होत होते. मात्र सध्या ही संख्या सव्वाशेवर पोहोचली आहे. ग्रामीण भागातील वैद्यकीय व्यवस्था स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अवलंबून असते. मात्र येथेही अपुरे मनुष्यबळ असल्याने पालिकेच्या वैद्यकीय व्यवस्थेवर ताण वाढला आहे. गेल्या १० दिवसांत पालिका क्षेत्रातील ५,०१८ जण तर ग्रामीण भागातील १,३८३ जण बरे झाले आहेत.

ग्रामीण  रुग्ण     शहरातील रुग्ण     मृत्यू

२७ एप्रिल      १६६             ४५३                   १०

२६ एप्रिल      १२९             ४०२                    १३

२५ एप्रिल      १७७              ५७७                   १०

२४ एप्रिल      १८२               ५२६                 १३

२३ एप्रिल      १७१             ६४५                    १४

२२ एप्रिल      १३५             ६१६                  १९

२१ एप्रिल      १५८            ७५९                   ८

२० एप्रिल      १८२             ६३६                  ६

१९ एप्रिल      १५०             ४८५                 १०

१८ एप्रिल      ११५            ५६८                  २

१७ एप्रिल      १५४            ५८३                 १३

१६ एप्रिल      १४५          ५०९                   २

एकूण         १८६४          ६७५९                १२०

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2021 2:02 am

Web Title: 120 deaths in eleven days in panvel due to coronavirus zws 70
Next Stories
1 दोन परिचारिकांना अटक
2 ३८९ इमारती प्रतिबंधमुक्त
3 दोन टँकर प्राणवायू मुंबईत
Just Now!
X