News Flash

नवी मुंबई : दिवसभरात आढळले १७२ नवे करोनाबाधित; १० रुग्णांचा मृत्यू

शहरात एकूण करोनाबाधितांची संख्या ४,६८७ वर

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी मुंबईत करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना मृतांची संख्याही दररोज वाढत आहे. आज १७२ नवे रुग्ण वाढले असून शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या ४,६८७ वर पोहोचली आहे. तर शहरात आज १० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या १५७ झाली आहे. शहरातील ४,६८७ रुग्णांपैकी २,६८३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

राज्यात आज ३,८७४ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर एकूण संख्या आता १,२८,२०५ अशी झाली आहे. आज नवीन १,३८० करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ६४,१५३ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ५८,०५४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2020 9:53 pm

Web Title: 172 new corona patients found during the day in navi mumbai 10 patients died also aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 शिक्षण नको, पण ऑनलाइन आवरा!
2  ‘कोविड’ रुग्णालयातील प्रखर प्रकाशझोतामुळे निद्रानाश
3 अर्धवट सुविधांमुळे पालिका रुग्णालयावर करोनाभार
Just Now!
X