नवी मुंबई : नवी मुंबईत गेल्या आठवडय़ात करोना संसर्ग झालेले रुग्ण झपाटय़ाने वाढले असले तरी ५१ करोना रुग्णांपैकी आतापर्यंत १८ रुग्ण उपचारांनंतर बरे झाले आहेत.  नवी मुंबईत करोनाच्या रुग्णांत वाढ होत असल्याने चिंता असताना यातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही अधिक आहे. शहरात आतापर्यंत ५१ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यातील १८ जणांची उपचारानंतर करोना चाचणी ही नकारात्मक आली आहे.  शहरात अद्याप मोजक्याच ठिकाणी करोना रुग्ण सापडले आहेत. यात तीन कुटुंबातीलच करोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे शहरात करोनावर बऱ्यापैकी नियंत्रण ठेवण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे.