आतापर्यंत नवी मुंबई महापालिकेकडून पाच तर खासगी केंद्रांवर चार लाख जणांना लस

नवी मुंबई : तिसऱ्या लाटेपूर्वी जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे नियोजन असले तरी लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरण विस्कळीत झाले आहे. शहरातील  १५ लाख लोकसंख्येच्या तुलनेत  ३० लाख लसमात्रांची गरज होती. आतापर्यंत ९ लाख मात्रा देण्यात आल्या असून अद्याप २१ लाख मात्रांची गरज आहे. दिलेल्या नऊ लाख लसमात्रांपैकी महापालिका केंद्रांवर ५ लाख, तर खासगी केंद्रांवर ४ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. १६ जानेवारीपासून शहरात लसीकरण सुरू आहे.

महिनाभरापासून लसतुटवडा सुरू असल्याने अपेक्षित लसीकरणाचे लक्ष पालिकेला गाठता येत नाही. पालिका प्रशासनाने दिवसाला १५ हजार जणांना लस देण्याचे नियोजन केले आहे. यापूर्वी लस उपलब्ध असताना १५ हजार जणांचे पालिकेने लसीकरणही केले आहे. मात्र लसच मिळत नसल्याने हे नियोजन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे सरासरी दिवसाला १ हजार लस मात्रा देण्यात येत आहेत. त्यामुळे लसीकरण संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही संताप व्यक्त होत आहे. मागील अनेक दिवसांपासून लसीकरण फक्त आठवडय़ातून काही दिवस होत आहे. तर अनेक वेळा फक्त दुसरी मात्राच दिली जात आहे.

तिसऱ्या लाटेपूर्वी प्रत्येक नागरिकाला किमान एक मात्रा देण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे, परंतु लसच उपलब्ध नसल्याने प्रशासन हतबल आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात सशुल्क लस घेण्याची वेळ नवी मुंबईकरांवर आली आहे. पालिकेची लस मिळत नसल्याने खासगी केंद्रांवर लस घेतली जात असून त्या

ठिकाणी आतापर्यंत ४ लाख

मात्रा देण्यात आल्या आहेत. ८४ खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी आहे.  एकंदरीत शहरातील १५ लाख लोकसंख्येला प्रत्येकी दोन मात्रा याप्रमाणे ३० लाख मात्रांची आवश्यकता होती, यापैकी ९ लाख मात्रा आतापर्यंत देण्यात आल्या आहेत. तर अद्याप २१ लाख मात्रांची गरज आहे. सध्याची परिस्थिती पाहता एवढय़ा

प्रमाणात लसमात्रा पालिका प्रशासनाला कधी मिळणार हा मोठा प्रश्न असल्याने नवी मुंबईकरांना खासगी केंद्रांचाच आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

५,०५,६९०

महापालिकेला प्राप्त मात्रा

३,९३,१२४

खासगी रुग्णालयांना प्राप्त मात्रा

६,७९,८९३

पहिली मात्रा :

२,१८,९२१

दोन्ही मात्रा

वेगात लसीकरण करण्यासाठीची आवश्यक यंत्रणा

सज्ज आहे. शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी १५ लाख लोकसंख्येनुसार ३० लाख मात्रांची आवश्यकता आहे. त्यातील आतापर्यंत ९ लाख मात्रा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आवश्यक लसपुरवठा झाल्यास अधिक वेगात लसीकरण करणे शक्य होणार आहे.

-डॉ. रत्नप्रभा चव्हाण, लसीकरण प्रमुख, महापालिका