15 July 2020

News Flash

नवी मुंबईतही २३ पोलीस कर्मचाऱ्यांना करोना

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मुंबईच्या तुलनेत पोलिसांवर ताण कमी आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी मुंबई : मुंबईनंतर नवी मुंबईतील पोलिसांनाही करोनाचा संसर्ग वाढला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात आजवर २३ जणांना संसर्ग झाला असून सात कर्मचारी बरे झाले आहेत. मुखपट्टीचा वापर न करणे, योग्य सामाजिक अंतर पोलिसांकडून ठेवले जात नाही. त्यामुळे संसर्ग वाढत असल्याने सुरक्षा नियमांचे काटेकार पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात मुंबईच्या तुलनेत पोलिसांवर ताण कमी आहे. दाट लोकवस्ती वा छोटे रस्ते नसल्याने पोलिसांना सामाजिक अंतर पाळणे सहज शक्य आहे. मात्र तरीही २३ पोलिसांना आतापर्यंत करोना झाल्याने पोलीस आयुक्तालय सतर्क झाले आहे. आयुक्त संजयकुमार यांनी एक समिती स्थापन केली असून त्याचे नेतृत्व सहाय्यक पोलीस आयुक्तांकडे दिले आहे. आयुक्तालय क्षेत्रातील २० पोलीस ठाण्यांतील पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाणार आहे. पोलिसांना मुखपट्टी, जंतुनाशकांचा  पुरवठा करणे, पोलीस ठाणे निर्जंतुकीकरण करणे, कर्मचारी आजारी असल्यास त्याची काळजी घेणे आदी जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपविण्यात आल्या आहेत. दररोज या संदर्भात अहवाल देणेही बंधनकारक करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2020 5:28 am

Web Title: 23 police personnel in navi mumbai tested positive for coronavirus zws 70
Next Stories
1 कर्नाटकात प्रवेश न मिळाल्याने मजूर परतले
2 अखेर खाडीपुलावर प्रकाशव्यवस्था
3 ‘एपीएमसी’ आवारात सुरक्षारक्षकाचा आकस्मिक मृत्यू
Just Now!
X