नवी  मुंबईत  करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत असून, मृतांची संख्याही दररोज वाढत आहे. वाढत्या संसर्गामुळे शहरात आज २५४ नवे रुग्ण वाढले आहे. तर आज सात जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.  याचबरोबर शहरातील करोनाबाधितांची  एकूण संख्या ११ हजार ९६६ झाली आहे.

करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ३४५ झाली आहे.  शहरात आतापर्यत तब्बल ७  हजार ७१८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर शहरात सध्या ३ हजार ८९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील करोना प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे.

मागील २४ तासांमध्ये महाराष्ट्रात ७ हजार १८८ करोना रुग्ण बरे होऊन गेले आहेत.त्यामुळे आत्तापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ८२ हजार २१७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या म्हणजेच रिकव्हरी रेट ५५.७२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान आज राज्यात ८ हजार ३६९ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात २४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातला मृत्यू दर ३.७५ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.