News Flash

नवी मुंबई : शहरात करोनाचे २५७ नवे रुग्ण, सात जणांचा मृत्यू

एकूण रुग्णसंख्या पोहोचली ७,६०२वर

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी मुंबईत करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत असून दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत आहेत. वाढत्या संसर्गामुळे शहरात १० दिवसांची कडक टाळेबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, शहरात आज २५७ नवे रुग्ण वाढले असून शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या ७,६०२ झाली आहे.

शहरात आज सात जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून आजवर करोनामुळे मृत झालेल्यांची एकूण संख्या २३९ झाली आहे. शहरात करोनामुक्त होण्याचा दर चांगला असून शहरात आत्तापर्यत तब्बल ४,२६६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर ३,०९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, राज्यात आज एकूण ७ हजार ७४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २४ तासांमध्ये २९५ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्येने २ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंतच्या करोना रुग्णांची संख्या २ लाख ६४ झाली आहे. यापैकी ८३ हजार २९५ अॅक्टिव्ह केसेस आहेत.दरम्यान, आज राज्यात ३३९५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १ लाख ८ हजार ८२ इतकी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 4, 2020 10:11 pm

Web Title: 257 new corona patients found in navi mumbai seven died aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 तीन ते तेरा टाळेबंदी!
2 मुंबईतील रुग्णांचा नवी मुंबईत भरणा
3 संभ्रमामुळे नागरिकांची गर्दी
Just Now!
X