मागील वर्षांच्या तुलनेत २३ कोटींनी वाढ

नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) जानेवारी ते डिसेंबर २०१७ या काळात २६६ कोटी ४४ लाख रुपयांचा महसूल जमा केल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी दिली. जानेवारी ते डिसेंबर २०१६ या वर्षांत २४४ कोटी ५७ लाख रुपयांचा महसूल जमा करण्यात आला होता. सन २०१६च्या तुलनेत २०१७ मध्ये उपप्रादेशिक परिवहनच्या तिजोरीत २३ कोटींनी वाढ झाली आहे. सन २०१६ मध्ये ४३ हजार ४२२ वाहनांची नोंदणी करण्यात आली होती. मात्र २०१७ मध्ये ४० हजार ६८३ वाहनांची नोंदणी झाली आहे. सन २०१६च्या तुलनेत २०१७ मध्ये वाहनांच्या नोंदणीत २७०० वाहनांची घट झाली असल्याचे दिसून येत आहे.

नवी मुंबई आरटीओला या आर्थिक वर्षांसाठी सरकारने २६७ कोटी रुपये महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र जीएसटी व ट्रॅक्समध्ये वाढ झाल्यामुळे  आरटीओला डिसेंबरमध्येच उद्दिष्ट साधण्यात यश आले आहे. आरटीओच्या महसुलात जानेवारी ते डिसेंबर २०१७ मध्ये २६६ कोटी ४४ लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. जोनवारी ते डिसेंबर २०१६ मध्ये आरटीओला २४४ कोटी ५७ लाखांचे उत्पन्न मिळाले होते. सन २०१६च्या तुलनेत सन २०१७ मध्ये आरटीओच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. मात्र वाहन नोंदणीत घट झाले असल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१६ या काळात ४३ हजार ४२२ वाहनांची नोंद झाली होती. मात्र सन २०१७ मध्ये फक्त ४० हजार ६८३ वाहनांची नोंद झाली आहे. सन २०१६च्या तुलनेत २०१७ मध्ये कमी वाहनांची नोंद झाली आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. याचा फटका वाहन खरेदीला पडला असल्याचे आरटीओच्या सूत्रांनी सांगितले. सन २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बीएस ३च्या वाहनांच्या इंजिनवर बंदी घातल्यांनतर वाहनांच्या रक्कमेत कंपन्यांनी ऑफर्स देऊन घट केली होती. म्हणून वाहनांची नोंदणी झाली होती. मात्र बीएस ३ इंजिन असणाऱ्या वाहनांच्या नोंदणीसाठी २ टक्के टॅक्स घेण्यात आल्यामुळे आरटीओच्या महसुलात कमी वाहने नोंदणी झाल्यांनतर देखील वाढ झाली आहे. तर नोटाबंदीचा फटका नवीन वाहन खरेदीला पडला आहे.

आरटीओचे मार्च अखेपर्यंत २६७ कोटी रुपये महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट आहे. नोटाबंदीमुळे वाहन नोंदणीमध्ये घट झाली असल्याची शक्यता आहे. मात्र ट्रक्स व जीएसटीच्या वाढीमुळे महसुलामध्ये वाढ झाली आहे.

संजय डोळे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी