News Flash

नवी मुंबईत दिवसभरात आढळले २८८ नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू

शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या ११,४२६ वर पोहोचली.

नवी मुंबईत करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत असून मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत. वाढत्या संसर्गामुळे शहरात आज २८८ नवे रुग्ण वाढले असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे.

शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या ११,४२६ झाली आहे. तर आज ३ जणांचा करोनामुळं मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या ३४३ झाली आहे. शहरात आतापर्यत तब्बल ७,२१३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर ३,८७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात प्रतिजन चाचण्या करण्यात येत आहेत. शहरातील करोनाप्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान सध्या महापालिकेसमोर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2020 7:50 pm

Web Title: 288 new patients found in navi mumbai during the day three died aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 नवी मुंबईत करोनाबाधितांची संख्या ११ हजाराच्या पुढे
2 नवी मुंबईत नव्या २४० करोनाबाधितांची नोंद
3 ‘एपीएमसी’तील ऑनलाइन खरेदीसाठीचे ‘अ‍ॅप’ चर्चेच्या फेऱ्यात
Just Now!
X