नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या २६ हजार पार झाली असून शहरात करोना मुक्तीचा दर ८५ टक्के झाला आहे. शहरात सोमवारी २८९ नवे करोनाबधित रुग्ण आढळले असून करोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्यामुळे प्रशासनासमोर चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. शहरात करोनामुळे मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत. वाढत्या संसर्गामुळे शहरात करोना बाधितांची एकूण संख्या २६,१४९ झाली आहे. शहरात सोमवारी ७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ५८८ झाली आहे.  शहरात आतापर्यत एकूण तब्बल २२,१०८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत तर शहरात ३,४५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत एकूण १ लाखांहून अधिक नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या असून करोनामुक्तीचा दर ८५ टक्के झाला आहे.