05 June 2020

News Flash

Coronavirus outbreak : नवी मुंबईत करोनाचे ३१ रुग्ण

सात जणांना आतापर्यंत उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.

(प्रतीकात्मक छायाचित्र)

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातही करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. बुधवारी दोन रुग्णांची वाढ झाली होती. गुरुवारी नेरुळ येथे आणखी एक करोनाबाधित रुग्ण सापडला असून करोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ३१ वर पोहोचली आहे.  शहरात एकूण २२८ नागरिकांची करोना चाचणी करण्यात आली असून आजपर्यंत ३१ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत,  तर १६३ जणांचे अहवाल नकारात्मक आहेत. ३४ जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबित आहेत. सात जणांना आतापर्यंत उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. १२८३ जणांचे घरीच अलगीकरण करण्यात आले आहे.

पालिका रुग्णालयांत खासगी डॉक्टरांची सेवा

नवी मुंबई : करोना संसर्गाच्या भीतीने शहरातील खासगी दवाखाने पालिकेने कारवाईचा इशारा दिल्यानंतरही सुरू झाले नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाने या खासगी डॉक्टरांना पालिका रुग्णालयात आरोग्य सेवा देण्यासाठी आवाहन केले होते. याला या डॉक्टरांनी चांगला प्रतिसाद दिला असून आतापर्यंत पन्नास डॉक्टर यासाठी पुढे आले आहेत. यातील काही जण तर विनामूल्य सेवा देण्यास तयार आहेत.

करोना संसर्ग नवी मुंबईतही वाढू लागल्याने भीतीपोटी शहरातील खासगी दवाखाने डॉक्टरांनी बंद केले होते. यामुळे इतर रुग्णांची गैरसोय होत होती. पालिका प्रशासनाने या डॉक्टरांना दवाखाने सुरू ठेवण्याचे आवाहन केले होते. मात्र याला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे पालिका रुग्णालयांवरील ताण वाढला होता. त्यात पालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता आहे. त्यामुळे या डॉक्टरांच्या मदतीने या संकटकाळात आरोग्य सेवा देण्यास मदत होईल म्हणून पालिकेने खसगी डॉक्टरांना पालिका रुग्णलयात सेवा देण्यासाठी आवाहन केले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.  ५० पेक्षा जास्त डॉक्टर आता पालिका रुग्णलयात आपली सेवा देणार आहेत. यासाठी त्यांना ५० हजार प्रति महिना मानधन देण्याचा विचार पालिका प्रशासन करीत आहे.  काही डॉक्टर विनामानधन सेवा देण्यास तयार आहेत.

आरोग्य सेवेचा ताण कमी होणार

शहरात छोटे दवाखाने  दीड हजारपेक्षा जास्त असून रुग्णालये १३० आहेत. यातील बहुतांश दवाखाने हे बंद आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने या रुग्णालयातील डॉक्टरांना पालिका रुग्णालयात सेवा देण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता.  ५० ते ६० जणांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांना अवशक्यतेनुसार करोना वा अन्य ठिकाणी नियुक्त केले जाणार आहे. एकदोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाईल. यामुळे पालिका आरोग्य सेवेवरील ताण निश्चित कमी होईल, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त महावीर पेंढारी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2020 1:43 am

Web Title: 29 coronavirus cases in navi mumbai zws 70
टॅग Coronavirus
Next Stories
1 सिडको शासनाला आर्थिक मदत देणार
2 Coronavirus lockdown : संचारबंदीच्या काळात तृतीयपंथीयांवर उपासमारीचे संकट
3 ‘एपीएमसी’ शनिवारपासून बंद
Just Now!
X