23 January 2021

News Flash

लहान मुलींना दाखवायचा अश्लील व्हिडिओ, CCTV फुटेजमुळे अडकला जाळ्यात

सीसीटीव्हीतून आरोपीची ओळख पटताच पोलिसांनी खबरींमार्फत आरोपीचा शोध घेतला. आरोपीने दोन्ही गुन्ह्यांच्या वेळी एकच कपडे घातले होते.

संग्रहित छायाचित्र

अल्पवयीन मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवणाऱ्या तरुणाला पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. विकेश विलास चव्हाण (२९) असे या तरुणाचे नाव असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

महिनाभरापूर्वी पनवेल शहर पोलीस ठाण्यात ११ वर्षांच्या मुलीला एका तरुणाने मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवल्याची तक्रार दाखल झाली होती. ११ फेब्रुवारी रोजीही १० वर्षांच्या मुलीला एका तरुणाने मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवल्याची तक्रार दाखल झाली. ही तक्रारही पनवेल शहर पोलीस ठाण्यातच दाखल झाली होती. महिनाभरात अशा स्वरुपाचे दोन गुन्हे घडल्याने पोलिसांच्या तपासाने वेग धरला. शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण आणि पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सीसीटीव्हीतून आरोपीची ओळख पटताच पोलिसांनी खबरींमार्फत आरोपीचा शोध घेतला. आरोपीने दोन्ही गुन्ह्यांच्या वेळी एकच कपडे घातले होते. विकेश चव्हाण असे या आरोपीचे नाव असून तो पटेल पार्क परिसरात राहतो. विकेशने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्या मोबाईलमध्ये अनेक पॉर्न व्हिडिओ सापडले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2019 9:48 am

Web Title: 29 year old man arrested for forcing minor girls to watch porn on mobile in panvel
Next Stories
1 हापूसची दरघसरण! भाव निम्म्यावर
2 पाण्याची उधळपट्टी
3 खाडीकिनारी रसायनमिश्रित गाळ
Just Now!
X