25 February 2021

News Flash

नवी मुंबईत दिवसभरात ३१३ कोविड योध्यांचे लसीकरण पूर्ण

देशभरात लसीकरण मोहिमेला आजपासून प्रारंभ

आजपासून करोना लसीकरणाला देशात प्रारंभ झाला असून ही आपल्यासाठी दिलासादायक गोष्ट आहे. १० महिन्यांपेक्षा अधिक काळात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी या कोविड योध्यांनी जो संघर्ष केला तसेच लस शोधण्यासाठी ज्या शास्त्रज्ञांनी अखंड परिश्रम करून योगदान दिले त्या सर्वांचे आपण आभारी आहोत, अशी भावना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी व्यक्त केली.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक रूग्णालय वाशी, सार्वजनिक रूग्णालय ऐरोली, डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालय नेरूळ व अपोलो हॉस्पिटल बेलापूर या ४ रूग्णालयातील करोना लसीकरण केंद्रावर आज लसीकरण सुरू झाले. लसीकरणाच्या आजच्या पहिल्या दिवशी वैद्यकीय अधिक्षक डॉ. वर्षा राठोड (सार्वजनिक रूग्णालय ऐरोली केंद्र), डॉ. विजय येवले, बालरोगतज्ज्ञ (सार्वजनिक रूग्णालय वाशी केंद्र), डॉ. आनंद सुडे, बालरोगतज्ज्ञ (डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालय, नेरूळ केंद्र) व वेंकटराम व्ही. (अपोलो हॉस्पिटल बेलापूर केंद्र) या करोना योध्यांना पहिली लस देण्यात आली.

शासनाच्या कोविन ॲपवर नोंदीत व ज्यांना आज आपले लसीकरण या केंद्रावर आहे असा मोबाईलवर संदेश आला आहे अशा एका केंद्रावर, एका दिवशी १०० व्यक्तींना लसीकरण करण्यात येत आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ४ केंद्रांवर आजच्या पहिल्या दिवसात ४०० पैकी ३१३ वैद्यकीय कोविड योध्यांचे लसीकरण करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त बांगर यांनी नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालयातील करोना लसीकरण केंद्राला या समुहाचे प्रमुख विजय पाटील व अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या समवेत भेट देऊन लसीकरण प्रक्रियेची पाहणी केली.

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात करोना काळात आरोग्य विषयक सेवा देणा-या शासकीय व खाजगी आरोग्यकर्मी करोना योध्यांना लसीकरण केले जाणार आहे. अशा १९ हजार ८५ करोना योध्यांची नोंद कोविन ॲपवर झालेली असून नवी मुंबई महानगरपालिकेस ठाणे जिल्हा आरोग्य विभागाकडून २१,२५० कोविशिल्ड लस प्राप्त झालेल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2021 9:39 pm

Web Title: 313 covid warriors has taken vaccine in navi mumbai during mass vaccination drive aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 नवी मुंबईत ४०० जणांना लस देण्याचे नियोजन
2 आधी मूलभूत सुविधा, मगच करआकारणी
3 राममंदिर निधी संकलनाद्वारे मतांचे ध्रुवीकरण
Just Now!
X