नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या १९,७५७ झाली आहे. शहरात आज ३१७ नवे करोनाबधित रुग्ण आढळले असून करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत आहे. शहरात मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत.

वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या २० हजाराकडे जात आहे. शहरात आज ७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ४९३ झाली आहे. शहरात आतापर्यत एकूण तब्बल १५,७६८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर शहरात ३,४९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहरात आतापर्यंत ४४,३८३ प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या आहे. शहरात दिवसभरात तीन हजारांपेक्षा अधिक चाचण्या होत आहेत. तर करोनामुक्तीचा दर ८० टक्के झाला आहे. नवी मुंबईत एकूण ८२,३८४ नागरिकांची करोना चाचणी करण्यात आली आहे.