नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या १८ हजारांच्या पुढे गेली आहे. शहरात आज ३३२  नवे करोनाबधित रुग्ण आढळले, तर आठ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत आहे. शहरात मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत. वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची  संख्या १८ हजार ४८१ वर पोहचली आहे. आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४६९ झाली आहे. तर,  शहरात आतापर्यत एकूण १४ हजार २८६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. शहरात ३ हजार ७२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहरात आतापर्यंत ३३,४५३ प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. शहरात करोना चाचण्यांची संख्या एका दिवसाला अडीच हजारांपेक्षा अधिक चाचण्या होत आहेत. करोनामुक्तीचा दर ७७ टक्क्यांपर्यंत पोहोचला  आहे. शहरासाठी ही समाधानकारक व दिलासादायक गोष्ट आहे. नवी मुंबईत एकूण ७० हजार १२३ नागरिकांची करोना चाचणी करण्यात आली आहे.