नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्या २८ हजार २१४ झाली असून, शहरात करोनामुक्तीचा दर ८५ टक्के झाला आहे. शहरात आज ३३५ नवे करोनाबधित रुग्ण आढळले असून, करोनाबाधितांच्या व मृतांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे.

वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची  एकूण संख्या २८ हजार २१४ झाली आहे. शहरात आज सात जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ६३० झाली आहे.  शहरात आतापर्यत एकूण २३ हजार ९३८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर ३ हजार ६४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, आतापर्यंत एकूण १,४२,०९७ जणांच्या चाचण्या  करण्यात आल्या असून करोनामुक्तीचादर ८५ टक्के झाला  आहे.

राज्यात करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात करोनाबाधितांच्या संख्येने उच्चांक गाठला. तब्बल २३ हजार ३५० नव्या करोनाबाधितांची आज नोंद झाली. तर ३२८ रुग्णांचा मृत्यू झाला. याचबरोबर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ९ लाख ७ हजार २१२ वर पोहचली. तर, ७ हजार ८२६ जणांनी आज करोनावर मात केली आहे.