नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ३४२ नवे करोनाबधित आढळले आहेत. शहरात करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत असून मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत. वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या १५,७२७ झाली आहे.

शहरात आज ७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ४२५ झाली आहे. शहरात आतापर्यत तब्बल १०,५६९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर शहरात ४,७३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत १८,४५४ प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तात्काळ करोना चाचणी अहवाल प्राप्त होत असून शहरातील करोना प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे.

शहरात करोना चाचण्यांची संख्या एका दिवसाला २ हजारांपेक्षा अधिक चाचण्या होत आहेत. तर महापालिकेची करोना चाचणीसाठीची स्वतंत्र प्रयोगशाळा लवकरच नेरुळ येथे सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे चाचण्यांची संख्या वाढणार आहे.