नवी मुंबई : शहरात करोना रुग्णांची वाढ चिंताजनक असून शुक्रवारी ३४७ करोना रुग्ण सापडले. ही गेल्या पाच महिन्यांतील सर्वाधिक वाढ आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

१७ मार्च रोजी शहरात ३१८ नवे रुग्ण साडपले. ही गेल्या पाच महिन्यातील सर्वाधिक वाढ होती. व फक्त दोन दिवसांत १८२ दैनंदिन रुग्णांची यात वाढ झाली होती. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा वाढ होत ३४७ नवे रुग्ण सापडले आहेत. ही वाढ शहरासाठी धोका असल्याचे संकेत पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

रुग्णवाढीमुळे शहरातील करोना रुग्णांची संख्या ५८,८५२  तर मृतांचा  आकडा ११४९ इतका झाला आहे. शुक्रवारी शहरात  १६४ जण  करोनामुक्त  झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या २३६६ इतकी झाली आहे. त्यामुळे करोनासाठी सध्या उपलब्ध असलेल्या आरोग्य व्यवस्थेत तातडीने वाढ करावी लागणार आहे.