09 March 2021

News Flash

नवी मुंबईत दिवसभरात ३९९ नवे करोनाबाधित, सात जणांचा मृत्यू

करोनाबाधितांची एकूण संख्या ३७ हजारांच्याही पुढे

(संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची एकूण संख्या ३७ हजाराच्याही पुढे गेली असून, शहरात आजपर्यंत एकूण ७७०जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे शहरात करोनामुक्तीचा दर ८८ टक्क्यांवर पोहचला आहे. शहरात आजपर्यंत एकूण ३७ हजार ८१७ करोनाबधित आढळले आहेत. तर, आज शहरात ३९९ नवे करोनाबधित रुग्ण

आढळले आहेत.शहरात  करोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे. वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची  एकूण संख्या ३७  हजाराच्या पुढे गेली आहे. आज शहरात सात रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, करोनामुळे मृत झालेल्यांची एकूण संख्या ७७० झाली आहे. शहरात  ३ हजार ६९४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत एकूण २ लाख ६ हजार ८३२ जणांच्या चाचण्या  करण्यात आल्या असून, करोनामुक्तीचा दर  वाढला आहे. शिवाय, शहरातील मृत्यू दर कमी झालेला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वाढणारी करोनाबाधितांची संख्या आता काहीशा प्रमाणात कमी होताना दिसत आहे. दिवसभरात राज्यात १४ हजार ३४८ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २७८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे चोवीस तासांमध्ये राज्यात १६ हजार ८३५ जणांनी करोनावर मात केली असून आता राज्यातील करोनामुक्त झालेल्यांची संख्या ११ लाख ३४ हजार ५५५ इतकी झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 9:55 pm

Web Title: 399 new corona patients in navi mumbai in a day and seven people died msr 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सफाई कामगारांची करोनामुक्तीसाठी ‘गांधीगिरी’
2 करोनाचा विळखा घट्ट
3 शेतघरे, नजीकची पर्यटन स्थळे गजबजली
Just Now!
X