२ लाख २७ हजार ९८८ जणांना पास

नवी मुंबई</strong> : खासगी वाहनातून जिल्ह्याबाहेर प्रवास करणाऱ्यांना ई-पास अजूनही बंधनकारक आहे. मात्र अनेकांच्या पदरी निराशा पडत आहे. कागदपत्रांचा अभाव,

वैद्यकीय प्रमाणपत्र नसणे, अपूर्ण माहिती यामुळे ई-पास नाकारले जात आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात आतापर्यंत ७ लाख ४६ हजार १४२ जणांनी ई-पासची मागणी केली होती, मात्र केवळ २ लाख २७ हजार ९८८ जणांना पास देण्यात आले आहेत.

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्याप कायम आहे. त्यामुळे राज्य सरकारने जिल्ह्याबाहेर खासगी वाहनाने प्रवास करताना ई-पासची सक्ती कायम ठेवली आहे. ई-पासच्या मंजुरीसाठी कोविड १९ या संकेतस्थळावर जाऊ न अर्ज केल्यानंतर संबंधित विभागातील पोलिसांकडून तो अर्ज मंजूर केला जातो.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय विभागाने १ मे पासून ई-पास देण्यासाठी परिमंडळ एक आणि दोन हे वेगवेगळे भाग केले आहेत.

त्यानुसर २३ मार्च ते १ मेपर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरांतील २ लाख ९२ हजार ४०३ रहिवाशांनी ई-पाससाठी अर्ज केले होते. पैकी ८१ हजार ८९४ रहिवाशांना मंजुरी देण्यात आली होती, तर एका पासबाबत निर्णय (पेंडिंग)

झाला नव्हता. १ मे नंतर परिमंडळ एक मध्ये २ लाख ४८ हजार १८४ जणांनी अर्ज केले होते, पैकी ८६ हजार ७३८ जणांचा अर्ज मंजूर झाले होते, तर १ लाख ६१ हजार ३५३  जणांना परवानगी नाकारण्यात आली होती. ९३ अर्जाबाबत निर्णय झाला नव्हता. परिमंडळ दोन मध्ये १ मे नंतर १ लाख ८८ हजार ७८२ रहिवाशांनी ई-पास साठी अर्ज केला होता, त्यापैकी  १ लाख ३४ हजार २७९ बाद ठरले होते, तर ५४ हजार ४०४ जणांना परवानगी देण्यात आली होती व ९९ अर्ज प्रलंबित होते. २३ मार्च ते २७ ऑगस्टदरम्यान एकूण ५६१ अर्ज प्रलंबित राहिले आहेत. यात १ मे पूर्वी ३६८ अर्ज प्रलंबित आहेत.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रातून २७ ऑगस्ट दुपारी २ वाजेपर्यंत  एकूण ७ लाख ४६ हजार १४२ जणांनी ई-पासची मागणी केली आहे.

मात्र ई-पास देताना असलेल्या नियमात जे पात्र होतात त्यांनाच परवानगी देण्यात येत असल्याने केवळ  २ लाख २७ हजार ९८८ नवी मुंबईकरांना ई-पास देण्यात आलेले आहे.

ई-पास देण्यासाठी नियमावली ठरवण्यात आली होती. कोरोनाव्यतिरिक्त अन्य रोगाने नातेवाईकाचे निधन झाले, कोणाचे जवळचे नातेवाईक अत्यवस्थ आहेत, स्वत:चा किंवा अति निकट नातेवाईकाचा विवाह आहे, आदी करणाव्यतिरिक्त जीवनावश्यक वस्तूंचे वहन करणाऱ्यांनाच ई-पास देण्यात येतात. मात्र अनेकदा अत्यावश्यक कारण नसताना अर्ज केले जातात. अत्यावश्यक काम  कागदपत्र देण्यात येत नाहीत, अशा विविध तांत्रिक कारणांनी ई-पासची परवानगी नाकारली जाते.

– प्रवीणकुमार पाटील, उपयुक्त गुन्हे शाखा