नवी मुंबईत दिवसागणिक करोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून आज ७८ नवे रुग्ण वाढले असून, शहरात करोनाबाधितांची संख्या १ हजार ९३१ झाली आहे. तर आज २ जणांचा मृत्यू झाला.
करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ६१ झाली आहे. तर शहरातून आतापर्यंत ८८१ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. शहरातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, वाशी येथील एक्झीबिशन सेंटर येथे पुढील ५ दिवसात १२०० खाटांचे कोवीड रुग्णालय सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
राज्यात आज 2 हजार 598 करोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. याचबरोबर एकूण संख्या आता 59 हजार 546 अशी झाली आहे. तर दुसरीकडे आज 698 करोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे आतापर्यंत उपचारानंतर बरे होऊन घरी पाठविण्यात आलेल्यांची संख्या एकूण 18 हजार 616 झाली आहे. सद्यस्थितीस राज्यात एकूण 38 हजार 939 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 28, 2020 9:54 pm