८०३ रुग्ण उपचाराधीन

नवी मुंबई : करोना संसर्ग वाढल्याने पालिका प्रशासनाने शहरात ५ हजार ९६५ खाटांची सुविधा निर्माण केली होती. मात्र दिवाळीनंतर सातत्याने रुग्णसंख्या घटत असल्याने यातील ५ हजार ०५९ खाटा या रिकाम्या आहेत. सध्या फक्त ८०३ रुग्ण उपचाराधीन आहेत.

नवी मुंबई शहरातील करोना प्रादुर्भावाची स्थिती दिलासादायक आहे. सोमवारी ५० नवे करोनाबाधित आढळले असून बाधितांची संख्या ही ५२,६५८ पर्यंत गेली आहे. तर करोनामुक्तीचा दर ९६ टक्के असून ५०,७७४ जण करोनामुक्त झाले आहेत. शहरात ८०३ रुग्ण हे उपचाराधीन आहेत.

त्यामुळे दिवाळीपूर्वी खाटा मिळण्यासाठी नातेवाईकांना धावपळ करावी लागत होती. आता ८५ टक्के खाटा या रिकाम्या आहेत. शहरातील १२ कराना काळजी केंद्रे पालिका प्रशासनाने बंद केली असून फक्त वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्रात उपचार एकवटले आहेत. अत्यवस्थ रुग्णांवर नेरुळच्या डॉ.डी.वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

खाटा                एकूण       शिल्लक

साध्या               ३२२७        ३०१३

प्राणवायू            २१५०       १७५८

अतिदक्षता-        ४३९          २१०

कृत्रिम श्वसन

यंत्रणा                १४९          ७८

एकूण                  ५०६१   ५०५९