उपचाराधीन रुग्णांमध्ये ३१ ते ४० वयोगटातील सर्वाधिक

नवी मुंबई : गणेशोत्सवानंतर  नवी मुंबई शहरात करोनाबाधितांची संख्या वाढली आहे. शहरात ३२ हजारांपर्यंत करोनाबाधित रुग्ण पोहोचले असून शहरात ३५४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात  ३१ ते ४० वयोगटातील  रुग्ण सर्वाधिक आहेत. शहरात करोनामुक्तीचा दर सुधारला असून महिनाभरापूर्वी दर हा ८० टक्के होता. तो आता ८७ टक्के झाला आहे.

आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहरातील मृत्युदर शून्यावर आणण्याचे लक्ष ठेवले आहे. शहरातील मृत्युदरही शेजारील महापालिकांच्या तुलनेत कमी आहे.  ५१ ते ६० वर्षे वयोगटातील नागरिकांची मृत्यूची संख्या अधिक आहे.  शहरातील मृत्युदर २.४२ टक्के होता तो २.१४ टक्के झाला आहे.

 

प्रत्यक्ष उपचार सुरू असलेले रुग्ण

* वय             रुग्ण

* ० ते १० वर्षे      १३२

* ११ ते २० वर्षे    २१९

* २१ ते ३० वर्षे     ६०१

* ३१ ते ४० वर्षे     ७३२

* ४१ ते ५० वर्षे     ६५९

* ५१ ते ६० वर्षे     ५६९

* ६१ ते ७० वर्षे     ४०४

* ७१ ते ८० वर्षे     १८३

* ८१ ते  ९० वर्षे    ४०

*९१ ते १०० वर्षे     ४

३१,६९१ शहरातील एकूण करोना रुग्ण.

२७,४७३  रुग्ण आतापर्यंत करोनामुक्त.

३५४३ रुग्णांवर विविध रुग्णालयांत  उपचार

शहरातील मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. शहरात उपचार घेत असलेले रुग्ण हे ३१ ते ४० वयोगटातील असून शहरात करोनामुक्तीचा दर हा ८७ टक्के झाला आहे हे शहरासाठी अत्यंत दिलासादायक असून शहराचा मृत्युदरसुद्धा ठाणे व आजूबाजूच्या तुलनेत सर्वात कमी आहे.

– सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त, नवी मुंबई महापालिका

जिल्ह्य़ातील करोनाबाधित

शहर              करोनाबाधित              मृत्यू

कल्याण-डोंबिवली    ३६,६६८             ७४४

नवी मुंबई                  ३१,६९१             ६७५

ठाणे                          ३१,२६७             ९११

मीरा-भाईंदर             १५,७९१            ४८९

ठाणे ग्रामीण            ११,९६६             ३५३

उल्हासनगर              ८,४०८             २५९

अंबरनाथ                  ५,६०८             २१०

बदलापूर                  ५,२५३                ७३

भिवंडी                     ४,५८४               २९५